नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:09 AM2017-10-26T00:09:54+5:302017-10-26T00:10:10+5:30
तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे यंत्रणेमार्फत नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करून संबंधित शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नवरगाव येथील शेतकºयांनी केली आहे.
यासंदर्भात सदर गावातील शेकडो शेतकºयांनी थेट कुरखेडा गाठून तहसीलदार व तालुका कृषी अधिकाºयांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, १७ व १८ आॅक्टोबरला कापणीयोग्य धानाची कापणी करण्यात आली. दरम्यान २० आॅक्टोबर रोजी अचानक परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमिनीतील कापलेले धानपीक कुजले. याशिवाय नवरगाव परिसरात तुडतुडा रोगाने कहर केल्यामुळे शेकडो हेक्टरवरील धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
निवेदन देताना माजी पं.स. सदस्य चांगदेव फाये, खुशाल कवाडकर, उरकुडा ठाकूर, भीमराव सहारे, नानाजी कोवे, प्रकाश कवाडकर, विठ्ठल कवाडकर, धनंजय पिल्लारे, बाबुराव किरसान, केशव किरसान, पीतांबर उईके, यशवंत ठलाल, वासुदेव मडावी, घनश्याम जांभुळकर, सितकुरा मानकर, मुकूंदा मडावी, अविनाश सहारे, सखाराम चौरिकर, विलास सूर्यवंशी, केशव कोसरे, श्रावण कोसरे, श्रीराम उईके, तुलाराम लाडे, मनोहर मानकर, नानाजी जांभुळकर, महादेव किरसान, श्रीराम राऊत, गुरूदेव कवाडकर, चेंडूदान मानकर, जगदीश मानकर, उदाराम कवाडकर, रमेश पिलारे आदींसह बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.