गरजू व अनाथ बालकांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:24 AM2021-06-30T04:24:03+5:302021-06-30T04:24:03+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुलचेराचे संवर्ग विकास अधिकारी आय. पी. लाकडे हाेते. उद्घाटन सुंदरदास उंदीरवाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. हिरादेवे, ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुलचेराचे संवर्ग विकास अधिकारी आय. पी. लाकडे हाेते. उद्घाटन सुंदरदास उंदीरवाडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. हिरादेवे, डी. एम. बारसागडे, संघटनेचे अध्यक्ष तथा गाेंडवाना सैनिकी शाळेचे मुख्याध्यापक संजीव गोसावी, उपसरपंच सत्यशील डोर्लीकर, राहुल फुलझेले, कवडू डोर्लीकर,मनोज खोब्रागडे, संघटनेचे उपाध्यक्ष रावण खोब्रागडे, सचिव शालिंदर मानकर उपस्थित होते. समाजातील होतकरू गरजू व अनाथ मुलांचा शोध घेऊन या बालकांना त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करता याव्यात या हेतूने समाज प्रबोधन कर्मचारी संघटनेने एक हात मदतीचा उपक्रम राबविला. सोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारसुद्धा केला. कार्यक्रमात अनाथ बालकांना रोख रक्कम व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक देण्यात आले तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ व ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील विषमतेची साखळी तोडून सर्वांना समान हक्क मिळावा यासाठी झटले. त्यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन आपणही सामाजामध्ये योग्य बदल घडवून आणावा, असे प्रतिपादन अडपल्ली माल येथील राजे धर्मराव हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण बोरकुटे यांनी केले. शाहू महाराजांचे विचार अंगीकारावे, असे मत प्रा. विठ्ठल निकुरे यांनी केले. इतिहासात जी थोर माणसे होऊन गेली,त्या ऐतिहासिक पुरुषांच्या मालिकेतून शाहू महाराजांचे नाव कोणालाही वगळता येणार नाही. राजर्षी शाहू महाराज लोकनेते होते. सामाजाला समान संधीचे मूलभूत हक्क मिळवून देणारे ते थोर राष्ट्रपुरुष होते, असे प्रतिपादन मुख्याध्यापक संजीव गोसावी यांनी केले. शाहू महाराज हे बहुजनांचे उद्धारक होते. आरक्षण मिळवून देण्याकरिता त्यांचे मोलाचे योगदान होते. स्त्रियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता त्यांनी अनेक प्रयत्न केले, असे मत आय.पी. लाकडे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन खुशाब डोंगरे तर आभार प्रकाश डोर्लीकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी वासुदेव गाेंगले, मधुकर वनकर यांनी सहकार्य केले.