विलगीकरणातील रुग्णांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:37 AM2021-05-13T04:37:13+5:302021-05-13T04:37:13+5:30
चामाेर्शी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने घारगाव येथील दाेघांचा काेराेनाने मृत्यू झाला; तर १९ जण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. ...
चामाेर्शी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने घारगाव येथील दाेघांचा काेराेनाने मृत्यू झाला; तर १९ जण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत. ग्रा. पं. घारगाव प्रशासनाने पुढाकार घेऊन रुग्णांना जि. प. शाळेत विलगीकरणात ठेवले आहे. गावातील रुग्णांची गैरसोय होऊ नये व रुग्ण लवकर बरे होऊन घरी येथील, अशी भावना ठेवून वीर शिवाजी क्रीडा मंचने पुढाकार घेऊन त्यांना पौष्टिक आहार देण्याचे ठरविले व रोज सकाळी चहा, बिस्किटे, फळे, अंडी, मास्क व सॅनिटायझर देण्यात येत आहे. पोलीसपाटील ठेमाजी आभारे, मंचचे अध्यक्ष अमोल मंगर, उपाध्यक्ष दीपक आभारे, सचिव आकाश झोडक, सागर भोयर, तुषार मंगर, लोमेश भगत, शरद मंगर, नीरज आभारे, गणेश भगत, तुकाराम आभारे, गोपाल आभारे, बाळकृष्ण धोटे, सूरज आभारे, प्रतीक आभारे मदत करीत आहेत. १२ मे रोजी घारगावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, वीर शिवाजी मंचचे पदाधिकारी यांची गावस्तरावर चर्चा झाली. त्यानुसार तपासणी, लसीकरण, विलगीकरण यावर भर देऊन गावात जनजागृती करण्याबाबत ठरविण्यात आले.
यावेळी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, विस्तार अधिकारी वासुदेव काळबांधे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, सरपंच विवेक भगत, उपसरपंच, कबीर आभारे आदी उपस्थित हाेते.
===Photopath===
120521\img-20210512-wa0161.jpg
===Caption===
घारगाव येथील वीर शिवाजी मंचाच्या कडून विलगीकरण आतील रुग्णांना मदतीचा हात तहसीलदार यांच्यासोबत सर्व पदाधिकारी यांची चर्चा