घर जळालेल्या कुटुंबाला मदत
By admin | Published: April 16, 2017 12:38 AM2017-04-16T00:38:30+5:302017-04-16T00:38:30+5:30
उपपोलीस स्टेशन व्यंकटापूर अंतर्गत येत असलेल्या आवलमरी येथील रहिवासी महिला पद्मा नरेश आत्राम यांच्या घराला ...
व्यंकटापूर पोलिसांचा पुढाकार : भांडे व साहित्य दिले
अहेरी : उपपोलीस स्टेशन व्यंकटापूर अंतर्गत येत असलेल्या आवलमरी येथील रहिवासी महिला पद्मा नरेश आत्राम यांच्या घराला १३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. व्यंकटापूर पोलिसांनी आत्राम कुटुंबाला जीवनोपयोगी साहित्य व आर्थिक मदत केली आहे.
घराला लागलेल्या आगीमध्ये धान्य, कपडे, भांडी जळून खाक झाले. पद्मा आत्राम यांचे पती एक वर्षापूर्वी कॅन्सरने मृत्यूमुखी पडले. तहसील कार्यालयाच्या वतीने पद्मा आत्राम यांना नुकतीच २० हजार रूपयांची आर्थिक मदत दिली होती. सदर पैसेही आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. पद्मा यांना दोन मुली व दोन मुले आहेत. व्यंकटापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाय. एस. पाटील, पोलीस उपनिरिक्षक ए. एस. हिवरकर, एस. सी. गोसावी हे पोलीस पार्टीसह घटनास्थळाला भेट दिली असता, ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे दिसून आले. व्यंटापूर पोलीस दलाच्या वतीने पीडित कुटुंबाला संसारोपयोगी साहितय, कपडे, भांडी, दोन क्विंटल धान्य तसेच पाच हजार रूपये रोख दिली आहे. (शहर प्रतिनिधी)