मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:47 PM2018-12-31T22:47:39+5:302018-12-31T22:47:53+5:30

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाडभिडी येथे कार्यारत असलेले प्राथमिक शिक्षक पत्रू लक्ष्मण नैताम यांचे आकस्मिक निधन झाले. शासनाने पेंशन बंद केल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले.

Helping the staff of the dead staff | मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास मदतीचा हात

मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास मदतीचा हात

Next
ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेचा पुढाकार : ९० हजार रुपयांचे अर्थसहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाडभिडी येथे कार्यारत असलेले प्राथमिक शिक्षक पत्रू लक्ष्मण नैताम यांचे आकस्मिक निधन झाले. शासनाने पेंशन बंद केल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली. वर्गणीतून जमा झालेले सुमारे ९० हजार रूपये नैताम यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले.
शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या कर्मचाºयांना १९८२ ची जुनी पेंशन योजना बंद करून अंशदायी पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाºयाचे आकस्मिक निधीन झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेंशन व इतर लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक मृतक कर्मचाºयांचे कुटुंब उघड्यावर पडतात. नैताम यांचेही आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने नैताम कुटुंब निराधार झाले.
महाराष्टÑ राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांकडून वर्गणी गोळा केली. यात सुमारे ९० हजार रूपयांचा निधी जमा झाला. त्या रकमेचा धनादेश, साडीचोळी जुनी पेंशन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रू नैताम यांच्या कुटुंबाला मदत दिली.
मदत जमा करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रवीण पोटवार, सरचिटणीस सुजीत दास, दीपक पुंगाटी, उपाध्यक्ष नीलेश मानापुरे, बापू भोयर, सचिन गायधने, सुनील खोब्रागडे, टिकेश ढवळे, राजू सोनटक्के, राजेश सरकार, प्रदीप भुरसे यांनी पुढाकार घेतला.
यावेळी जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आखाडे, सुरेश चव्हाण, सुरेश पालवे, किशोर कोहळे, मारोती वनकर, सिद्धार्थ सोरते, भगवान मेश्राम, आशिष गेडाम, प्रकाश बहेटवार, शिवराज हुलगुंडे, आलोक मंडल, विलास खानोरकर, पुरूषोत्तम कोवाची, सुरेश कुंभमवार, अरूण गुरनुले आदी उपस्थित होते.

Web Title: Helping the staff of the dead staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.