गेल्या वर्षीच्या महापुरातील नुकसानग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:42+5:302021-09-02T05:19:42+5:30

मागील वर्षी २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० यादरम्यान आरमोरी तालुक्यात महापूर आला होता. या महापुराने शेती ...

Helping the victims of last year's floods | गेल्या वर्षीच्या महापुरातील नुकसानग्रस्तांना मदत

गेल्या वर्षीच्या महापुरातील नुकसानग्रस्तांना मदत

Next

मागील वर्षी २८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० यादरम्यान आरमोरी तालुक्यात महापूर आला होता. या महापुराने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आरमोरी तालुक्यातील मुल्लुररीठ, अरसोडा, डोंगरगाव, ठाणेगाव, देऊळगाव, डोंगरसावंगी, चामोर्शी माल, वणखी, वासाळा, करपडा, चक, आरमोरी, रामपूरचक, शेगाव व पालोरा आदी गावातील शेती पिकांचे त्यात नुकसान झाले होते. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्यापही आरमोरी येथील तहसील कार्यालयात किंवा संबंधित गावच्या तलाठ्याकडे सादर केलेले नाही, त्या शेतकऱ्यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक, यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून यादीत नाव असल्याची खात्री करावी. त्यानंतर आपल्या बँक खात्याची माहिती आरमोरी येथील तहसील कार्यालयात सादर करावी, असे तहसीलदार डहाट यांनी कळविले.

Web Title: Helping the victims of last year's floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.