आॅनलाईनसाठी मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:02 AM2019-03-06T01:02:58+5:302019-03-06T01:05:37+5:30
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आरटीई अंतर्गत गरजू मुला-मुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील झोपडपट्टी व दलित वस्तीमध्ये बार्टीच्या समतादुतांनी घराघरी जाऊन डिसेंबर २०१८ ते २०१९ या कालावधीत आरटीई अंतर्गत गरीब व गरजू मुलांना शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी ८७० आॅफलाईन अर्ज भरले. या केंद्राच्या माध्यमातून आरटीई अंतर्गत सर्वसामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास सुलभ होणार आहे.
बार्टीचे महासंचालक कैलास कनसे यांच्या मार्गदर्शनात मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या नेतृत्त्वात जिल्ह्यात समतादूतांमार्फत आरटीई अंतर्गत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे मंगळवारी प्रकल्प अधिकारी मनीष गणवीर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
गोकुलनगर येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक २३ येथे सदर फिरत्या आरटीई केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी मिरा दरडमारे, अंगणवाडी सेविका मनीषा जुर्मेड, समतादूत वंदना धोंगडे, होमराज कवडो, संघरत्न कुंभारे, जयलाल सिंद्राम तसेच पालक उपस्थित होते.
समतादुताशी संपर्क साधून अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.