ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:52+5:302021-09-04T04:43:52+5:30
हेल्पलाइनचे ध्येय आणि हेल्पलाइनअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसंदर्भातील माहिती यावेळी देण्यात आली. या राष्ट्रीय हेल्पलाईनची सुरुवात लवकरच राज्यात होणार आहे. ...
हेल्पलाइनचे ध्येय आणि हेल्पलाइनअंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसंदर्भातील माहिती यावेळी देण्यात आली. या राष्ट्रीय हेल्पलाईनची सुरुवात लवकरच राज्यात होणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकारमार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी सर्व राज्यात ही हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पी. एच. घोटेकर, सचिव एस. के. बावणे, कोषाध्यक्ष आर. टी. हेमके, सहसचिव एस. एच. म्हशाखेत्री, तसेच इतर सदस्य, सल्लागार आणि तालुका प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते.
(बॉक्स)
भावनिक आधार व मदत मिळणार
राज्य शासनाचा सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जनसेवा फाऊंडेशन पुणे, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन चालविली जाणार आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून माहिती देणे, मार्गदर्शन करणे, भावनिक आधार, प्रत्यक्ष मदत, आदी सेवा प्रामुख्याने दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना असणाऱ्या समस्या हेल्पलाईन क्रमांक- १४५६७ या क्रमांकावर मांडाव्यात, असे क्षेत्रीय प्रतिनिधी गणेश शेंडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.