हाणामारी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार

By admin | Published: August 3, 2014 11:22 PM2014-08-03T23:22:56+5:302014-08-03T23:22:56+5:30

देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री

A high-level inquiry into the case will be conducted | हाणामारी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार

हाणामारी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार

Next

गडचिरोली : देसाईगंज नगर पालिकेचे कर्मचारी अशोक माडावार व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्यात झालेल्या वाद व मारहाण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस महानिरिक्षक यांना दिले आहे. १ आॅगस्ट रोजी या संदर्भात गृहमंत्र्यांनी आदेश निर्गमित केले असून या प्रकरणी माडावार यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मोटवानी यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
२४ जुलै रोजी मुख्य अधिकारी विनोद जाधव यांच्याकडे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी गेले असताना त्यांच्या कक्षात कर्मचारी अशोक माडावार आलेत व त्यांनी मोटवानी यांच्याशी वाद घातला. या प्रकरणात माडावार व मोटवानी दोघानीही पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच मुख्याधिकारी यांनीही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी मोटवानी यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करून माडावार यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी व मुख्याधिकारी जाधव यांनी केलेल्या खोट्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी पोलीस महानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र यांना या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मोटवानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपल्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने उच्च अधिकाऱ्याच्या कक्षात येऊन गैर वर्तवणूक करणे हे नियमबाह्य आहे. मुख्याधिकारीही माडावार यांना घाबरतात. (प्रतिनिधी)

Web Title: A high-level inquiry into the case will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.