शेततळ्यासाठी सर्वाधिक अर्ज चामोर्शी तालुक्यातून ३,५५६ शेतकऱ्यांचे अर्ज : १,४३१ ची निवड

By Admin | Published: June 16, 2016 02:06 AM2016-06-16T02:06:03+5:302016-06-16T02:06:03+5:30

मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. सिंचनाची सुविधा नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभार्थ्यांकडून मिळाला.

The highest application for the farmer: 3,556 farmers' application from Chamorshi taluka: choice of 1,431 | शेततळ्यासाठी सर्वाधिक अर्ज चामोर्शी तालुक्यातून ३,५५६ शेतकऱ्यांचे अर्ज : १,४३१ ची निवड

शेततळ्यासाठी सर्वाधिक अर्ज चामोर्शी तालुक्यातून ३,५५६ शेतकऱ्यांचे अर्ज : १,४३१ ची निवड

googlenewsNext

गडचिरोली : मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले. सिंचनाची सुविधा नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यात या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभार्थ्यांकडून मिळाला. सर्वाधिक ७८९ अर्ज चामोर्शी तालुक्यातून आलेले आहेत. यापैकी १५० अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
गडचिरोली तालुक्यात ४२८ अर्जांपैकी १२५ अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत. धानोरा ५८५ अर्ज आले असून १२५ अर्ज योग्य आहे. मुलचेरा तालुक्यात २९१ अर्जांपैकी १०० अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत. देसाईगंज येथे ९८ अर्जांपैकी ६२ अर्ज योग्य असून आरमोरी तालुक्यात २४४ अर्ज आले आहेत. त्यापैकी १३० अर्ज योग्य आहेत. कुरखेडा तालुक्यात २२५, कोरची तालुक्यात ११३ अर्ज आले आहेत. यापैकी अनुक्रमे १९९ व १०० अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
अहेरी उपविभागात अहेरी तालुक्यात २००, एटापल्ली तालुक्यात ३७०, भामरागड १२८, सिरोंचा ८५ अर्ज शेततळ्यासाठी आले. यापैकी अहेरी तालुक्यात १४०, एटापल्ली तालुक्यात १४० व भामरागड व सिरोंचा येथे प्रत्येकी ८० अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरले आहेत. एकूण ३ हजार ५५६ अर्जांपैकी १ हजार ४३१ लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करून त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

Web Title: The highest application for the farmer: 3,556 farmers' application from Chamorshi taluka: choice of 1,431

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.