सर्वाधिक पाऊस भामरागडात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:06 PM2019-08-05T23:06:57+5:302019-08-05T23:07:22+5:30
यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सुरूवातीचे तीन नक्षत्र कोरडे गेले. मात्र त्यानंतर पावसाने जोर पकडला. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस बरसत आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमान भामरागड तालुक्यात झाले आहे. आजपर्यंत भामरागड तालुक्यात १३०६.४ मिमी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५ आॅगस्टपर्यंत भामरागड तालुक्यात १०० टक्के पाऊस बरसरला. जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी, नाले, तलाव, बोड्यांमध्ये जलसाठा वाढला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी आतापर्यंत तीन वेळा संपर्क तुटला आहे.
१ जूनपासून आतापर्यंत अहेरी तालुक्यात सरासरी ९०१ मिमी पाऊस बरसला असून पर्जन्यमानात अहेरी तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पर्जन्यमानाच्या आकडेवारी मुलचेरा व एटापल्ली तालुक्याचा क्रमांक लागतो. मुलचेरा तालुक्यात ८९० मिमी व एटापल्ली तालुक्यात ८५३ मिमी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ६०६ मिमी पाऊस झाला आहे.
संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक घरांची अंशत: व काही घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. प्रशासनाच्या वतीने पडझड झालेल्या घर व जनावरांच्या गोठ्यांचे पंचनामे केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही. वैरागडजवळून वाहणाºया वैलोचना नदीलाही दोनदा पूर आला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने धानपीक रोवणीचे काम काही भागात थांबले आहे. कारण बºयाच ठिकाणच्या शेतजमिनी पूर्णत: पाण्याखाली आल्या आहेत. एकूणच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
१ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात झालेला पाऊस
तालुका पाऊस (मिमी)
भामरागड १३०६.४
अहेरी ९०१.०
मुलचेरा ८९०.२
एटापल्ली ८५३.०
धानोरा ८१०.९
कुरखेडा ७९७.०
आरमोरी ७९३.६
कोरची ७२८.०
गडचिरोली ७२६.१
देसाईगंज ७२२.४
चामोर्शी ६८८.९
सिरोंचा ६०६.०
सरासरी ८१८.६