महामार्गाच्या कामामुळे धुळीचा त्रास वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:37+5:30
चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यातच वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्याने येथे नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना श्वसनाचे व इतर आजार हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्मी गेटसमोरून जुन्या तहसीलकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गानेसुद्धा वाहनांची व पादचारी लाेकांची प्रंचड गर्दी दिसून येते. घोटवरून चामोर्शीमार्गे येणाऱ्या सर्व दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांचे आवागमन याच मार्गाने असते. अनेक वाहनधारक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत असल्याने वाहतुकीस अडथळा येताे. वाहतुकीची काेंडी साेडविणे व धुळीच्या त्रासापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययाेजना कराव्यात, अशी मागणी हाेत आहे.
एकेरी वाहतूक अडचणीची
चामोर्शी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूक काेंडीचा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर ताेडगा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असल्याने अपघाताचा धाेका आहे.