कडधान्य पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:55 PM2019-09-09T23:55:46+5:302019-09-09T23:57:32+5:30

गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात.

Hit the cereal crops | कडधान्य पिकांना फटका

कडधान्य पिकांना फटका

googlenewsNext
ठळक मुद्देयंदा प्रचंड घट येणार : तूर, तीळ, पोपटसह व इतर पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वदूर भागात गेल्या २० ते २५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतली नाही. पाऊस थांबण्याचे चिन्ह दिसत नसून तसेच सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून तुरीची झाडे कुजत आहेत. त्यामुळे तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका, तूर, तीळ, पोपट, वाल, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांना बसला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानपिकाची शेती केली जाते. सन २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात सर्व पिकांचे मिळून लागवडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर इतके होते. यापैकी धानपिकाचे क्षेत्र सव्वालाखांवर होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँका व सहकारी सोसायट्यांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. तसेच कडधान्य पिकाची पेरणी केली. गडचिरोली जिल्ह्यात कापूस व सोयाबीन या पिकात काही शेतकरी तुरीचे आंतरपीक घेतात. अलिकडे आंतरपिकासह अनेक शेतकरी संपूर्ण शेतात तुरीचे पीक घ्यायला लागले आहे. काही शेतकरी संर्पूण वावरी शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी करतात. यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात तूर व सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र संततधार पावसामुळे हे पीक धोक्यात आले आहे.
पावसाळ्याच्या सुरूवातीला पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली होती. त्यानंतर आता संततधा पावसामुळे कडधान्य पिकाची नासाडी होत आहे. अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन काठालगतच्या शेतजमिनीतील सोयाबीन, तुरी व इतर कडधान्याचे पीक नष्ट झाले. २५ जुलैपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. सतत पाऊस येत असल्याने शेताच्या सखल भागातील तुरी पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. तर काही शेतातील पीक मुसळधार पावसामुळे वाकले असून त्यांचीही स्थिती बिकट आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात तुरीचे पीक शेवग्यावर येते. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांची वाढ खुंटली असून शेतकरी चिंतेत आहे. ज्या शेतकºयांनी तुरीचा पीक विमा काढला, त्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र उत्पन्नात घट येणार हे निश्चित आहे. सोयाबीन, कापूस पिकाचीही स्थिती अतिपावसामुळे चिंताजनक आहे.

शेतकºयांचे बजेट कोलमडणार
धानपिकासोबत विविध प्रकारच्या कडधान्याचे उत्पादन घेऊन शेतकरी ही प्रगती करण्याचा प्रयत्न करीत असतो. दोन्ही प्रकारचे पीके घेतले तर त्याला चांगला आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा अतिवृष्टी धान या मुख्य पिकासह तूर, तीळ, पोपट, वाल या कडधान्य पिकासह सोयाबीन व कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांचे आर्थिक बजेट यावर्षी कोलमडणार आहे. आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Hit the cereal crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती