व्होकेशनल शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:01 AM2018-09-05T01:01:17+5:302018-09-05T01:02:18+5:30

Hold vocational teachers | व्होकेशनल शिक्षकांचे धरणे

व्होकेशनल शिक्षकांचे धरणे

Next
ठळक मुद्देविविध मागण्या : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन




लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्टÑ व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.४) राज्यव्यापी धरणे कार्यक्रमांतर्गत गडचिरोलीत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाºयांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी केलेल्या विविध मागण्यांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांवर जोर देण्यात आला. त्यात व्यवसाय अभ्यासक्रमाची रुपांतरण प्रक्रिया पूर्णत: स्थगित करून या अभ्यासक्रमास एनएसक्यूएफचा दर्जा प्राप्त करून द्यावा, तसेच अनुदान देऊन सक्षमीकरण करावे, या अभ्यासक्रमाची विद्यार्थीसंख्या पूर्वीप्रमाणे प्रतितुकडी २० करावी, आढावा समितीचा अहवाल सार्वत्रिक करून त्याची अंमलबजावणी करावी, घड्याळी तासिकेवरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी, पायाभूत अभ्यासक्रम शिकविणाºया तासिका तत्वावरील शिक्षकांची पर्यायी शैक्षणिक अर्हता एम.कॉम. बी.एड्./ एम.ए. (इको) बी.एड्. करावी, ५० टक्के पदे भरण्यासंदर्भात असलेल्या शासन निर्णयानुसार पद भरतीला कालमर्यादेत मंजुरी द्यावी आदींसह इतर मागण्यांचा समावेश होता. या धरणे आंदोलनात डी.एम.हिरादेवे, बी.के.राठोड, डी.एम.उत्तरवार, ए.एस. मद्दीवार, आर.आर.ढवळे, ए.पी. मार्लीवार, डी.जी. मेश्राम, ओ.एस. बारसागडे, ए.एच.रणदिवे, यु.पी.पुंजे, एफ.जी. सहारे, आर.के. बारसागडे, जे.जी. खटवार, एस.आर.कुटे, एस.वाय.मालेवार व इतर शिक्षकवृंद सहभागी झाले होते.
 

Web Title: Hold vocational teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.