ठिकठिकाणी वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:35 AM2019-08-02T00:35:05+5:302019-08-02T00:35:36+5:30
वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
गडचिरोली : विदर्भात विजेची निर्मिती होते. यामुळे प्रदुषणाचा सर्वाधिक त्रास विदर्भवासीयांना सहन करावा लागतो. तरीही वीज बिलात कोणतीही सुट दिली जात नाही. उलट अतिरिक्त दर आकारून आगाऊची रक्कम वसूल केली जात आहे. याचा विरोध करण्यासाठी गडचिरोली येथे आंदोलन करण्यात आले. वीज बिलाची होळी सुध्दा करण्यात आली. महावितरणचे गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, जिलहा सचिव डॉ. देवीदास मडावी, उपाध्यक्ष रमेश उप्पलवार, प्रभाकर बारापात्रे, सुलोचना मडावी, डी. डी. सोनटक्के, पांडुरंग घोटेकर, दत्तात्रय बर्लावार, दत्तात्रय पाचभाई, पी. टोपरे, तुळसाबाई खोबरे, गोवर्धन चव्हाण, चंद्रशेखर जक्कनवार, रमेश भुरसे, एजाज शेख, विश्वनाथ भिवापुरे यांच्यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते हजर होते.
घोट : येथील बसस्थानक चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत नागरिकांनी मोर्चा काढला.येथील ३३ केव्ही उपकेंद्रासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. या आंदोलनामध्ये विदर्भ आंदोलन समिती दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, बाबुराव भोवरे, दिनकर लाकडे, बंडू जुवारे, उमाजी कुद्रपवार, गिरीश उपाध्ये, राजू गोयल, परशुराम दुधबावरे, प्यारेलाल डोंगरे, समीर भोयर, गौर शहा, अमित शहा, अश्विनी वडेट्टीवार, आरीफ सय्यद, दीपक लाकडे, अनिता पोरेड्डीवार, अमर शहा, आबाजी वैरागडे, मंजुळाबाई काटवे, संगीता वडेट्टीवार, कमल येनप्रेडीवार, भारत पाटील हजर होते. मागणीचे निवेदन वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता वाळके यांना देण्यात आले.
कुरखेडा : विदर्भ राज्य आंदोलन समिती कुरखेडाच्या वतीने उपविभागीय अभियंता कार्यालय कुरखेडासमोर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आंदोलन करून वीज बिलाची होळी केली. मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविले. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह मरकाम, तालुकाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुका उपाध्यक्ष रमेश मानकर, युवा आघाडी अध्यक्ष ज्ञानचंद सहारे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सेवाराम ठेला, रामचंद्र कोडाप, मिना भोयर, शिला इस्कापे आदी हजर होते.