बसपाच्या वतीने ईव्हीएमची होळी
By admin | Published: March 15, 2017 02:01 AM2017-03-15T02:01:12+5:302017-03-15T02:01:12+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची ओरड मतदारांमध्ये होत आहे
गांधी चौकात आंदोलन : बॅलेटद्वारे मतदान घेण्याची मागणी
ेगडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची ओरड मतदारांमध्ये होत आहे. निवडणूक आयोगाने पूर्ववत निवडणूक प्रक्रिया बॅलेट पद्धतीने घ्यावी, या मागणीसाठी बसपाच्या वतीने १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकात प्रतिकात्मक इव्हीएम मशीनची होळी करण्यात आली.
यावेळी बसपा जिल्हाध्यक्ष वामन राऊत, दुष्यंत चांदेकर, जिल्हा प्रभारी रमेश मडावी, हरीश मंगाम, जॉनी सोमनकर, तुकाराम दुधे, प्रशांत दोनाडकर, धनपाल शेंडे, कृष्णा वाघाडे, मोरेश्वर आत्राम, ईश्वर बारसागडे, प्रफुल्ल म्हशाखेत्री, सिद्धार्थ घुटके, उमेश डोंगरे यांच्यासह बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा सरकारने राज्यभरातील इव्हीएम मशीनमध्ये घोळ केला आहे. याबाबतचे आरोप गडचिरोलीसोबतच राज्यभरातूनही होत आहेत. या बाबीची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची स्वतंत्र चौकशी करावी, इव्हीएम मशीनमध्ये घोळ आढळून आल्यास संबंधित उमेदवारांचा विजय रद्द करावा, निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली आहे. बसपाच्या वतीने राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.