स्वतंत्र विदर्भासाठी नागपूर कराराची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:44 AM2017-09-29T00:44:57+5:302017-09-29T00:45:10+5:30
विदर्भाला झुकते माप देण्याच्या उद्देशाने नागपूर करार करण्यात आला. मात्र राज्य शासनाने नागपूर कराराची पूर्णपणे पायमल्ली केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भाला झुकते माप देण्याच्या उद्देशाने नागपूर करार करण्यात आला. मात्र राज्य शासनाने नागपूर कराराची पूर्णपणे पायमल्ली केली आहे. नागपूर करारावर आपला विश्वास राहला नसून राज्य शासनाने स्वतंत्र विदर्भ द्यावा, या मागणीसाठी स्वतंत्र विदर्भ संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाºयांनी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले.
कायमस्वरूपी समतोल विकास करण्यासाठी प्रादेशिकस्तरावर व स्थानिकस्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकार प्रदान करण्याचे नागपूर करारात अंतर्भूत आहे. मात्र राज्य शासनाने विदर्भाचा विकास न करता पश्चिम महाराष्टÑाचाच विकास केला आहे. विदर्भाच्या माथी अजूनही उपेक्षाच आली आहे. महाराष्टÑात राहून विदर्भाचा विकास होणे शक्य नाही, त्यामुळे स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन केले. आंदोलनात अरूण मुनघाटे, रमेश भुरसे, एजाज शेख, समया पसुला, गोवर्धन चव्हाण, नारायण मस्के, मनोहर हेपट, रमेश उप्पलवार, जनार्धन साखरे, बालू मडावी, विवेक चडगुलवार, रूचित वांढरे, सूरज मडावी, विवेक भुरसे, प्रतिक डांगे, प्रतिक बारसिंगे यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांची सुटका केली.
आरमोरी येथे विदर्भवाद्यांनी केले आंदोलन
आरमोरी येथील ब्रह्मपुरी-देसाईगंज टी-पार्इंटवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी माजी आ. हरीराम वरखडे यांच्या नेतृत्वात नागपूर करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी केली. या कार्यक्रमाला शालिक नाकाडे, वामनराव जुआरे, श्रीराम कार, नरेंद्र तिजारे, दौलत मुर्वतकर, गोपिचंद मने, गणपतराव सेलोकर, यादव सहारे, ऋषी बांडे, कृष्णराव गारोदे, डाकराम चुटे, गंगाधर कोहाडे, तुकाराम कांबळे, शालिकराम मसराम, तारीक खान, छगन हेडावू उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.