गडचिराेलीत बुधवारपर्यंत सुटी; मंगळवारसाठी रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 09:34 PM2022-07-11T21:34:13+5:302022-07-11T21:34:55+5:30
Gadchiroli News गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी तीन दिवस जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुटी जाहीर केली आहे.
गडचिरोली: हवामान विभागाने केलेल्या सूचनेनुसार गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी संजय मीना यांनी तीन दिवस जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुटी जाहीर केली आहे.
याशिवाय पूरस्थितीत संकटाचा सामना करण्यासाठी पथकांना सज्ज ठेवले आहे. गाेदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकाेटा, पामुलगाैतम, इंद्रावती नद्याची पाण्याची पातळी वाढली असून अनेक मार्ग बंद आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाद्वारे, शाळा - महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. सर्व खाजगी कार्यालये - आस्थापना या बुधवार, १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील.