सत्ताधाºयांकडून पोकळ आश्वासने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:40 AM2017-09-01T00:40:32+5:302017-09-01T00:41:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भात व महाराष्टÑात अंगणवाडी कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. संघटनेच्या वतीने सातत्याने मागणी करूनही राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ केली नाही. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली सत्ताधाºयांची सर्व आश्वासने पोकळ व खोटी ठरली आहेत, असा घणाघाती आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला.
देसाईगंज येथे शहीद स्मारकावर अंगणवाडी कर्मचारी महिलांचा मेळावा सरिता आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दहिवडे बोलत होते. प्रास्ताविक निशा कामडी यांनी केले. यशस्वीतेसाठी वंदना बावणे, मिनाक्षी देवस्कर, कल्पना निमसरकार, परवीन शेख, लता खोब्रागडे आदी अंगणवाडी कर्मचाºयांनी सहकार्य केले.
पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, २० जुलै २०१६ रोजी शासनाने मानधन वाढ कमिटी गठित केली. या कमिटीने मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र या प्रस्तावाची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे सध्याचे सत्ताधारी नेते केवळ पोकळ आश्वासने देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडी कृती समितीला संपाचा निर्णय घ्यावा लागला. बेमुदत संप ही एक लढाई आहे, असे दहिवडे म्हणाले.
कोरचीतही निदर्शने
अंगणवाडी कर्मचाºयांबाबत राज्य व केंद्र शासनाचे धोरण विरोधी असल्याने या कर्मचाºयांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनी कोरची शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, विमल कमरो, वंदना टेंभूर्णे, उषा शेंडे, विजया उईके, नीता कोचे, प्रीती आत्राम, मंदा शेंडे, कार्तिकस्वामी कोवे, करूणा कावळे आदी कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.