गृहकर्ज स्वस्त, मात्र बांधकाम साहित्य महाग,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:37+5:302021-07-25T04:30:37+5:30
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपडत असते; मात्र त्याला पैशाच्या मर्यादा ...
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपडत असते; मात्र त्याला पैशाच्या मर्यादा पडतात. गृहकर्जाच्या माध्यमातून बँकांनी ही समस्या साेडविली आहे; मात्र रेती, विटा, सिमेंट, लाेखंड, टाइल्स, नळ फिटींग, इलेक्ट्रीक फिटिंगचे साहित्य यांच्या किमती मागील दाेन वर्षात जवळपास ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. लाॅकडाऊननंतर तर आणखीणच भर पडली आहे.
बाॅक्स
शहरापासून दूर घरे स्वस्त मात्र ये-जा करणे महाग
गडचिराेली शहराच्या मध्यभागी, राष्ट्रीय महामार्गाजवळचे प्लाॅट सर्वसामान्य व्यक्तीला खरेदी करणे शक्य हाेत नाही. नवीन वस्त्यांमध्ये प्लाॅट थाेडे स्वस्त मिळतात. त्यामुळे नागरिक त्या ठिकाणचे प्लाॅट खरेदी करून घर बांधतात; मात्र पेट्राेलच्याही किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शहरातून घराकडे ये-जा करण्याचा खर्चही वाढत चालला आहे.
बाॅक्स
अर्धे अधिक गृहकर्जासाठी अपात्र
सर्वसाधारण कर्जाच्या तुलनेत गृहकर्ज स्वस्त आहे; मात्र त्यासाठी ज्या ठिकाणी घर बांधले जात आहे, ताे प्लाॅट अकृषक असणे आवश्यक आहे. अकृषक प्लाॅट महाग राहत असल्याने गडचिराेली शहरातील नागरिक ताे खरेदी करीत नाही, त्यामुळे प्लाॅटधारक कृषी जमीने अवैध पद्धतीने तुकडे पाडून घरांसाठी जागा विकतात; मात्र या ठिकाणी घर बांधल्यास गृहकर्ज मिळत नाही.
बाॅक्स
क्रेडिट स्काेअरवरून व्याजाच्या दरात पडू शकते फरक
बँका जाे व्याज दर दाखवितात. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक प्रमाणातच व्याजदर आकारला जातेा. ज्या व्यक्तीचा क्रेडिट स्काेअर अधिक राहतेा, त्याला कमी व्याजदराने तर क्रेडिट स्काेअर कमी असलेल्या व्यक्तीला अधिक व्याज दर आकारला जातेा.
बाॅक्स
घर बांधणे कठीणच
प्लाॅट व बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे घर बांधणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेर झाले आहे. दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या किमती वाढत असल्याने काहीच बचत हाेत नाही. अशातच बांधकाम साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे घर बांधणे आवाक्याबाहेर झाले आहे.
- देवानंद सातपुते, नागरिक.
बाॅक्स
असे आहेत गृहकर्जाचे दर
स्टेट बँक ऑफ इंडिया- ६.७०
बँक ऑफ इंडिया- ६.७०
एचडीएफसी- ६.७५
जिल्हा सहकारी बँक- ७.९५
बाॅक्स
बांधकाम साहित्याचे दर
सिमेंट- ३४० रुपये प्रती बॅग
लाेखंड-५५०० रुपये प्रती ब्रास
विटा-८००० रुपये प्रती दाेन हजार नग
गिट्टी-४००० रुपये प्रती ब्रास
रेती- ४५०० रुपये प्रती ब्रास