जोगीसाखऱ्यात पोळा अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:44 AM2021-09-09T04:44:15+5:302021-09-09T04:44:15+5:30
जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, आष्टा, कासवी, रामपूर, कनेरी आदी गावातील विद्युतचा तीन ते चार दिवसांपासून लपंडाव सुरू ...
जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, आष्टा, कासवी, रामपूर, कनेरी आदी गावातील विद्युतचा तीन ते चार दिवसांपासून लपंडाव सुरू असल्याने ग्रामीण भागात अंधार पसरलेला होता. अशातच शेतकरी शेतमजुरांचा महत्त्वाचा सण पोळादेखील अंधारात गेल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा निरुत्साह झाला. पावसाचे दिवस असल्याने डासांपासून नागरिक त्रस्त झाले. बालगोपाळांची रात्रीला झोप उडाली. विद्युत नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असताना जंगलालगतच्या गावांना हिंस्त्र प्राण्यांपासून धोका होण्याची दाट शक्यता असते. या सर्व समस्या घेऊन विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यासाठी काँग्रेसचे आदिवासी सेलचे जिल्हा सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात विद्युत महावितरण कंपनीच्या ग्रामीण विभागाच्या अभियंत्याला घेराव घालून विद्युत लपंडावाची समस्या निकाली काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गरफडे, देवनाथ झलके, सचिन माने, एकनाथ खोब्रागडे, तेजस माने, गौरीशंकर हजारे, प्रीती हजारे, मंदा नखाते, जाईबाई भोयर आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्युत वितरण कंपनीला शेतकऱ्यांचे व नागरिकांचे थकीत बिल वसुली करण्यासाठी सहकार्य करू, असे आश्वासन उपस्थित नागरिकांनी दिले.