काेविड याेद्ध्यांना नुसताच मान, तीन महिन्यांपासून मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:24 AM2021-07-09T04:24:00+5:302021-07-09T04:24:00+5:30
काेराेनाच्या दुसऱ्या साथीत एकाचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत पाेहाेचली हाेती. एवढ्या माेठ्या प्रमाणात असलेल्या रुग्णांना सेवा देण्यास आराेग्य ...
काेराेनाच्या दुसऱ्या साथीत एकाचवेळी सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारापर्यंत पाेहाेचली हाेती.
एवढ्या माेठ्या प्रमाणात असलेल्या रुग्णांना सेवा देण्यास आराेग्य यंत्रणा कमी पडत असल्याने ११० कंत्राटी कर्मचाऱ्यांची बाह्य स्त्राेतामार्फत नेमणूक करण्यात आली. हे कर्मचारी आराेग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे काम करीत हाेते. या कर्मचाऱ्यांनी काेराेनाच्या कालावधीत उत्तम सेवा बजावली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. तसेच काेराेनाची साथ कमी हाेण्यासही मदत झाली. मागील तीन महिन्यांपासून सेवा बजावत असताना त्यांना एकही दिवसाचे मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बाॅक्स
मागील तीन महिन्यांपासून आपण काेराेना वाॅर्डात काम करीत आहाेत. रुग्णांची सेवा करण्याबराेबरच त्यांना मदत करीत आहाेत. रूग्ण संख्या चार हजारांवर पाेहाेचली हाेती. त्यावेळी तर आठ तासापैकी एकाही मिनिटाची फुरसत राहत नव्हती. मात्र आम्हाला एकदाही मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- कंत्राटी कर्मचारी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
तीन महिन्यांपासून मानधन न मिळणे ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र अजूनही मानधन मिळाले नाही. आता जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन मिळत नसल्याने काम करण्याचा उत्साह राहिला नाही.
- कंत्राटी कर्मचारी
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
बाॅक्स
त्रुटी दाखवून मानधन कपातीचा धाेका
-रूग्णालयातील काही ताेडफाेड झाल्यास तेवढी रक्कम मानधनातून कपात केली जाणार असल्याचे कंत्राटात कंपनीने लिहून घेतले आहे. त्यामुळे वेतन देतेवेळी विविध कारणे सांगून मानधनात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
-आधीच वेतन कमी त्यात पुन्हा कपात हाेत असल्याने कर्मचारी चिंतेत आहेत.
बाॅक्स ...
आराेग्य कर्मचाऱ्यांचेही मानधन रखडले
काेराेना काळात काही परिचारिका, डाॅक्टर यांची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. एकच महिन्याचे मानधन देण्यात आले. दाेन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने हे आराेग्य कर्मचारीसुद्धा अडचणीत आले आहेत.
बाॅक्स ..
सध्या कामावर असलेले कर्मचारी - ११०
मानधनाची प्रतीक्षा असलेले कर्मचारी - ११०