शहिदांना वाहिली आदरांजली

By admin | Published: September 24, 2016 03:14 AM2016-09-24T03:14:44+5:302016-09-24T03:14:44+5:30

जम्मू-काश्मिर राज्याच्या उरी क्षेत्रात लष्कर तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने यात २० जवान शहीद झाले.

Honorarium of martyrs | शहिदांना वाहिली आदरांजली

शहिदांना वाहिली आदरांजली

Next

उरी हल्ल्याचा निषेध : बेतकाठी व आलापल्लीत कार्यक्रम
गडचिरोली/कोरची/आलापल्ली : जम्मू-काश्मिर राज्याच्या उरी क्षेत्रात लष्कर तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने यात २० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा जिल्ह्यातील विविध भागात निषेध केला जात आहे. गडचिरोली, कोरची तालुक्याच्या बेतकाठी व अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे पाकिस्तानचा निषेध करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
गडचिरोली येथील फुले-आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने महिला महाविद्यालयात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, प्रा. व्ही. एस. गोर्लावार, प्रा. गहाणे, प्रा. किशोर कुडे, प्रा. लाकडे, प्रा. गौर, प्रा. निंबाळकर, प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा. बुटले, ग्रंथालय विभाग प्रमुख वर्षा तिडके उपस्थित होत्या. यावेळी दोन मिनीटे मौन पाळून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुष्प अर्पण करण्यात आले. यशस्वीतेसाठी शुभम दागमवार, प्रमोद भोयर, प्रकाश कुनघाडकर, भावना लांजेवार, कल्याणी बोरकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
कोरची तालुक्याच्या बेतकाठी येथे ग्रामस्थांच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मेनबत्ती जाळून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुरेश काटेंगे, रामटेके, राजकुमार नाईक, नागपुरे, वीरेंद्र आदे, विनोद कोरेटी, वासनिक, उसेंडी, पुस्तोडे, बोरकर, कन्नाके, कचलाम, गायधनी, प्रकाश नैताम, माजी सैनिक विलास गजभिये, गहाणे, खुणे उपस्थित होते.
आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात नागरिक व राजे धर्मराव हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महेश रापर्तीवार, प्रतीक खोब्रागडे, अक्षय माडोरे, स्वप्नील श्रीरामवार, हसन पठाण, अनिल जंगमवार, श्रीनिवास गडमवार व शिक्षक उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. (लोकमत वृत्तसेवा)

Web Title: Honorarium of martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.