सन्मान निधी परतीच्या नाेटीसला 50 वर शेतकरी करदात्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 05:00 AM2021-05-29T05:00:00+5:302021-05-29T05:00:29+5:30
या याेजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांत प्रति हप्ता दाेन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. आता दुसऱ्या हप्त्यात दाेन हजार व तिसऱ्या हप्त्यात दाेन हजार रुपये जमा हाेणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. त्या मानाने येथे सिंचन सुविधा ताेकड्या आहेत. त्यात काेराेना संकटाचे सावट आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पंतप्रधान किसान सन्मान निधी याेजनेंतर्गत ऑनलाइन अर्ज भरलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, लाभ देण्यात आलेल्या व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना नाेटीस बजाविण्यात आली. नाेटीस बजावूनही ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अजूनही नाेटीसला काेणताही प्रतिसाद दिला नाही.
या याेजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्ष तीन समान हप्त्यांत प्रति हप्ता दाेन हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. आता दुसऱ्या हप्त्यात दाेन हजार व तिसऱ्या हप्त्यात दाेन हजार रुपये जमा हाेणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या माेठी आहे. त्या मानाने येथे सिंचन सुविधा ताेकड्या आहेत. त्यात काेराेना संकटाचे सावट आल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले. दरम्यान, शासनाच्या या याेजनेचा आर्थिक लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्यासाठीची कार्यवाही तहसील कार्यालय स्तरावरून केली जाते. या याेजनेच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही महसूल विभागातर्फे केली जात आहे.
आतापर्यंत १८ लाख ८० हजार रुपये वसूल
- पंतप्रधान किसान याेजनेचा काही शेतकऱ्यांना फायदा, तर काहींसाठी याेजना डाेकेदुखी ठरली आहे. आयकर भरतात म्हणून अनेक शेतकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने नाेटीस पाठविण्यात आली आहे.
- एकाच कुटुंबातील दाेन शेतकऱ्यांना अर्थात पती-पत्नीला याचा लाभ मिळाला असेल तर एकाला नाेटीस बजाविण्यात आली आहे.
- गडचिराेली जिल्ह्यात सदर याेजनेंतर्गत एकूण १ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला. यापैकी आयकर भरणाऱ्या व अपात्र असलेल्या एकूण ७६१ शेतकऱ्यांना नाेटीस बजावली आहे. यापैकी १९७ शेतकऱ्यांनी १८ लाख ८० हजार शासनाला परत केले आहेत.
१५० शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही
पंतप्रधान किसान सन्मान निधी याेजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळून जिल्हाभरातील एकूण १ लाख ५३ हजार शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ देण्यात आला.
या याेजनेंतर्गत शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या याेजनेचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्रुटी दूर करून लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी याेजनेंतर्गत माझ्या ओळखीच्या अनेक शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. जे प्रत्यक्ष शेती कसत नाहीत, अशा शेतकऱ्यांनीसुद्धा या याेजनेचा लाभ घेतला आहे. काेराेनामुळे गडचिराेली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिशय बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाच्या अशा याेजनेचा लाभ गरजू व पात्र शेतकऱ्यांना मिळणे गरजेचा आहे. या याेजनेच्या लाभासाठी नाेंदणी झाली आहे. मात्र, लाभ मिळण्याच्या मी प्रतीक्षेत आहे.
- डंबाजी कुरवटकर,
धान उत्पादक शेतकरी