मानद वन्यजीव रक्षक पदासाठी नियुक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:00+5:302021-09-02T05:19:00+5:30

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्याची राज्यात सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा ...

An honorary wildlife ranger should be appointed | मानद वन्यजीव रक्षक पदासाठी नियुक्ती करावी

मानद वन्यजीव रक्षक पदासाठी नियुक्ती करावी

googlenewsNext

निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्याची राज्यात सर्वाधिक वनव्याप्त जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून येथील जंगलामध्ये विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अहेरी उपविभागात चपराळा अभयारण्य, भामरागड अभयारण्य, कोलमार्का अभयारण्य यांची निर्मिती करण्यात आली आहे. कमलापूर येथे हत्ती कॅम्प असून अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. वनजिवांच्या रक्षणासाठी वन्यजीव रक्षकाचे पद महत्त्वाचे आहे.

१ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील उदय पटेल यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उदय पटेल यांच्यावर वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत योग्य न्यायिक कारवाई करण्याबाबतचे पत्र निघाले आहे. अशा व्यक्तीला मानद वन्यजीव रक्षक पद देणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले हे पद रद्द करून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक वन्यजीवप्रेमींची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहेरी तालुकातर्फे देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना म.रा.म.पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड, सचिव अनिल गुरनुले, प्रशांत ठेपाले, ओमप्रकाश चुणारकर, महेश येरावार, अमोल कोलपाकवार, अखिल कोलपकवार उपस्थिती होते.

310821\1944-img-20210831-wa0004.jpg

गडचिरोली जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी स्थानिक वन्यजीवप्रेमींची नियुक्ती करावी आ.धर्मरावबाबा आत्राम यांना म.रा. मराठी पत्रकार संघ अहेरी चे निवेदन

Web Title: An honorary wildlife ranger should be appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.