उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:28+5:302021-07-02T04:25:28+5:30
याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगिता पिपरे उपस्थित हाेते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा ...
याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगिता पिपरे उपस्थित हाेते. कार्यक्रमात जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंखी, डॉ. माधुरी किलनाके आदींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व वृक्षांचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेश बारसागडे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रंजिता कोडाप, शेतकरी आघाडीचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, पुष्पा करकाडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
010721\01gad_2_01072021_30.jpg
पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांचा सत्कार करताना खा. अशाेक नेते.