रेखेगावात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:18 AM2017-10-29T00:18:21+5:302017-10-29T00:18:51+5:30
चामोर्शी तालुक्यातील आमगाव म. परिसरातील रेखेगाव जंगल परिसरात वाघ आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव म. : चामोर्शी तालुक्यातील आमगाव म. परिसरातील रेखेगाव जंगल परिसरात वाघ आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
अनंतपूर येथील शेतकरी प्रकाश नरताम यांनी त्यांच्याशी शेतात बैलाला गवत टाकून बांधून ठेवले होते. प्रकाश नरताम हे शेतात काम करीत होते. २७ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वाघाने बैलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र बैलाने दावा तोडून पळ काढला. नागरिकांनीही आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने पळून गेला. आमगावचे बिट वनरक्षक पोचगंटीवार यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, घटनास्थळावर वाघाच्या पंजांचे ठसे दिसून आले. रेखेगाव धान कापणीला सुरूवात झाली आहे. अशातच वाघ आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी जंगलाच्या दिशेने सायंकाळनंतर एकटे जाऊ नये, असे आवाहन वनरक्षक पोचगंटीवार यांनी केले आहे.