७३९ हेक्टरवर होणार फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:34 AM2018-04-29T00:34:12+5:302018-04-29T00:34:12+5:30

फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.

Horticulture will be done on 73 9 hectares | ७३९ हेक्टरवर होणार फळबाग

७३९ हेक्टरवर होणार फळबाग

Next
ठळक मुद्दे९९ हजार रोपे : कृषी विभागाचे प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : फळशेतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत असून २०१८-१९ या वर्षात सुमारे ७३९ हेक्टरवर फळबागेची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये ९९ हजार रोपांची निर्मिती केली जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील जमीन व वातावरण फळपिकांसाठी लाभदायक असले तरी येथील शेतकरी अजूनपर्यंत फळबागेकडे वळला नसल्याचे दिसून येते. फळबागेमध्ये काही वर्ष आंतरपीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होण्यास मदत होते. येथील शेतकरी फळबागेकडे वळावा, यासाठी कृषी विभागाच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. २०१७-१८ या वर्षात प्रती कृषी सहायक १० हेक्टरचे लक्षांक देण्यात आले होते. त्यानुसार २५३ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी केल्यानंतर २०१ शेतकऱ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यातील ४१ शेतकºयांनी ४२.४८ हेक्टरवर फळपिकांची लागवड केली आहे.
यावर्षी ३५० हेक्टरवर आंबा, प्रत्येकी ५० हेक्टरवर काजू, चिकू, कागदी लिंबू, आवळा रोपे, प्रत्येकी १० हेक्टरवर सीताफळ, आवळा कलमे, जांभूळ, फणस व बांबू पिकाची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व थोड्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिल्यास शेतकरी फळबागांकडे वळेल, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी आंबा, काजू, चिकू, सिताफळ, काजू, लिंबू, आवळा, जांभूळ, फणस आदी फळांची कलमे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या कलमांचे कृषी विभागाच्या मार्फत वितरण होणार आहे.
२०१८-१९ यावर्षात ७३९ हेक्टरवर ९९ हजार फळझाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यात सोनापूर, वाकडी, कृष्णनगर, रामगड व कसनसूर येथे शासकीय रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमध्ये कलमे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
आंबा पिकाकडे कल
गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन आंबा पिकासाठी योग्य असल्याने आंबा पिकाचे चांगले उत्पादन होत असल्याचा शेतकºयांचा अनुभव आहे. त्यामुळे आंबा पिकाखालील क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याचे दिसून येते. मागील वर्षी ४२ हेक्टरवर आंबा पिकाची लागवड झाली.

Web Title: Horticulture will be done on 73 9 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.