अहेरीतील रुग्णालयाला ठाेकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:37 AM2021-05-10T04:37:46+5:302021-05-10T04:37:46+5:30
काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नसतानाही डाॅ. अमाेल पेशेट्टीवार हे काेराेना रुग्णांवर उपचार करीत असल्याची गाेपनीय ...
काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात प्रशासनाची काेणतीही परवानगी घेतली नसतानाही डाॅ. अमाेल पेशेट्टीवार हे काेराेना रुग्णांवर उपचार करीत असल्याची गाेपनीय माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. त्यानुसार अहेरी तालुका कोविड सनियंत्रण समितीने रुग्णालयाची तपासणी केली असता, तेथे एकूण सहा रुग्ण भरती असल्याचे आढळून आले. त्यांतील एक रुग्ण काेराेनाबाधित हाेता. त्यानुसार रुग्णालयाला सील ठाेकण्यात आली आहे. अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, अहेरी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण वानखेडे, अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे, अहेरी मंडल अधिकारी एकनाथ चांदेकर, तलाठी कौसर पठाण, रोशन दरडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील चाैकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.