‘बेस्ट बीफाेर’च्या आदेशाला हाॅटेल व्यावसायिकांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:39+5:30

खाद्यपदार्थांच्या प्रत्येक सीलबंद पाॅकेटवर निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, हे लिहिलेले राहते. मात्र, अनेक पदार्थ हाॅटेलमध्येच बनवून त्याच ठिकाणी विकले जातात. ते कधी बनविले व  किती दिवसांत ते वापरणे चांगले आहे, याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहत हाेते. विशेषकरून यातील काही पदार्थ ओले राहत असल्याने ते लवकरच खराब हाेण्याची शक्यता राहते. दुकानदार मात्र मुदत संपली तरी ते पदार्थ विकत हाेते

Hoteliers slam the order of 'Best Before' | ‘बेस्ट बीफाेर’च्या आदेशाला हाॅटेल व्यावसायिकांचा ठेंगा

‘बेस्ट बीफाेर’च्या आदेशाला हाॅटेल व्यावसायिकांचा ठेंगा

googlenewsNext

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : सीलबंद न करता ट्रेमध्ये ठेवून विक्री करणाऱ्या प्रत्येक मिठाई तसेच अन्य पदार्थांवर बेस्ट बीफाेरची तारीख लिहिलेला बाेर्ड असणे आवश्यक आहे. मात्र, लाेकमतने गडचिराेली शहरातील चार हाॅटेलचे (स्वीटमार्ट) रविवारी स्टिंग ऑपरेशन केले असता एकाही हाॅटेलमध्ये असे बाेर्ड आढळून आले नाही. 
खाद्यपदार्थांच्या प्रत्येक सीलबंद पाॅकेटवर निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, हे लिहिलेले राहते. मात्र, अनेक पदार्थ हाॅटेलमध्येच बनवून त्याच ठिकाणी विकले जातात. ते कधी बनविले व  किती दिवसांत ते वापरणे चांगले आहे, याबाबत ग्राहक अनभिज्ञ राहत हाेते. विशेषकरून यातील काही पदार्थ ओले राहत असल्याने ते लवकरच खराब हाेण्याची शक्यता राहते. दुकानदार मात्र मुदत संपली तरी ते पदार्थ विकत हाेते. यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका असल्याने शासनाने पॅक न हाेणाऱ्या खाद्यपदार्थांबाबतही निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, याची तारीख असलेला बाेर्ड लिहिणे आवश्यक केले हाेते. याबाबतचा शासननिर्णय सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आला हाेता. त्यावेळी काही दिवस हाॅटेल व्यावसायिक असे बाेर्ड लावत हाेते. आता मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. लाेकमतने रविवारी चार स्वीटमार्टचे स्टिंग ऑपरेशन केले असता एकाही हाॅटेलमध्ये निर्मितीची तारीख व किती दिवसांच्या आत ताे खाद्यपदार्थ खाऊ शकताे, याबाबतचे बाेर्ड लावले नसल्याचे आढळून आले. अन्न व औषध प्रशासन विभागाने हाॅटेलची तपासणी करण्याची गरज आहे.

बहुतांश स्वीटमार्ट चालकांचे दुर्लक्ष

मूलमार्ग 
मूलमार्गावरील एका हाॅटेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले असता त्या ठिकाणी मिठाईच्या ट्रेमध्ये बाेर्ड लावला हाेता. त्यावर मिठाईचे नाव व किंमत लिहिली हाेती. त्याच बाेर्डवर बेस्ट बीफाेर असे लिहिण्यात आले हाेते. मात्र, त्यावर काेणतीही तारीख टाकण्यात आली नव्हती. 

मास्कच्या बाबतीत आनंदीआनंद 
स्वीटमार्टमधील मालक व नाेकर यापैकी एकानेही मास्क घातला नव्हता. गडचिराेली शहरातील स्वीटमार्ट अतिशय लहान आहेत. त्यामुळे एकाचवेळी चार ते पाच ग्राहक आल्यास साेशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे शक्य हाेत नाही. अशातच ग्राहकही मास्क न घालताच हाॅटेलमध्ये आले असल्याचे दिसून आले. 

आरमाेरीमार्ग 
आरमाेरीमार्गावरील एका हाॅटेलमध्ये स्टिंग ऑपरेशन केले असता त्या ठिकाणी तर एकही बाेर्ड आढळून आला नाही. हे पदार्थ कधीपर्यंत खाऊ शकताे, याबाबत हाॅटेलमालकाला विचारणा केली असता पेढा व इतर गाेड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवलेले राहत असल्याने अनेक दिवस ते खराब हाेत नसल्याचे सांगितले.

स्वच्छतेचे काय
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हाॅटेल व स्वीटमार्ट बाहेरून चकाचक बनविले आहेत. मात्र, ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनविले जातात, त्या ठिकाणी खरेच स्वच्छता पाळली जाते काय, हा प्रश्न आहे. त्या ठिकाणाची चाैकशी हाेणे आवश्यक आहे. 

कारवाई हाेत नसल्याने व्यावसायिक बिनधास्त 
अन्न व औषधी विभागाचे अधिकारी नेहमीच आपल्याकडे कमी प्रमाणात मनुष्यबळ आहे, असे तुणतुणे वाजवित राहतात. ते हाॅटेलची तपासणीच करीत नाही. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. कारवाई हाेत नसल्याने स्वीटमार्टचालक व हाॅटेल व्यावसायिक बिनधास्त असल्याचे दिसून येतात. 
 

 

Web Title: Hoteliers slam the order of 'Best Before'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल