शॉर्ट सर्किटमुळे घर जळाले, जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:21+5:302021-09-04T04:43:21+5:30
बोडगेलवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे घरात आग लागली. ...
बोडगेलवार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास शाॅर्टसर्किटमुळे घरात आग लागली. घरातून धूर निघत असल्याने आग लागल्याचे राजू गोट्टमवार यांच्या लक्षात आले. गोट्टमवार यांनी आरडाओरड केली. अहेरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे या आपल्या चमूसह या परिसरात दुचाकी चोरट्यांची धुमाकूळ घातला असल्याने बोरी येथे मध्यरात्रीच्या सुमारास गस्तीकरिता आल्या हाेत्या. दरम्यान, त्यांनी नागरिकांचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतले. सदर ठिकाणी पोहोचताच घराला आग लागल्याचे लक्षात येताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घराचा दार तोडून आत प्रवेश केला. ग्रामपंचायत राजपूर पँचच्या हातपंपाने व इतर साधनाने आग आटोक्यात आणली. घरातील आवश्यक कागदपत्रे व घरगुती वापरासाठी असलेली फ्रीज व अन्य जीवनाश्यक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. मात्र, यात जीवितहानी टळली.
आग आटोक्यात आणण्यासाठी अहेरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, पाेलीस शिपाई प्रशांत हेडावू, दीपक कत्रोजवार, हवालदार बांबोळे, दीपा आत्राम, ग्रामपंचायत राजपूर पँचचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेश गंगाधरीवार, संगणक परिचालक विनोद सदनपवार, नितीन गुंडावार, अमित बोमकंटीवार व गावातील अन्य नागरिकांनी सहकार्य केले. या आगीमध्ये बोडगेलवार कुटुंबीयांचे साहित्य जळून खाक झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.