नियंत्रणमुक्त पेट्राेल-डिझेल दाेन महिन्यांपासून स्थिर कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 05:00 AM2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:42+5:30
खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्राेल व डिझेलची विक्री हाेते. बहुतांश पेट्राेल व डिझेल आयात केला जाताे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी कच्च्या तेलाच्या किमती बदलतात. त्यानुसार दाेन महिन्यांपूर्वी पर्यंत दरदिवशी पेट्राेल व डिझेलचे भाव बदलत हाेते. मात्र दाेन महिन्यांपासून अचानक भाव स्थिर आहेत. आता भाव कसे स्थिर आहेत, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : सरकारचे पेट्राेल व डिझेलच्या किमतीवर काेणतेही नियंत्रण नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतार झाल्यास त्यानुसार पेट्राेल व डिझेलच्या किमती बदलतात, असे सरकारकडून सांगण्यात येते. मात्र मागील दाेन महिन्यांपासून पेट्राेल व डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काेणताही बदल झाला नाही काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खासगी व सरकारी कंपन्यांमार्फत देशभरात पेट्राेल व डिझेलची विक्री हाेते. बहुतांश पेट्राेल व डिझेल आयात केला जाताे. आंतरराष्ट्रीय बाजारात दरवर्षी कच्च्या तेलाच्या किमती बदलतात. त्यानुसार दाेन महिन्यांपूर्वी पर्यंत दरदिवशी पेट्राेल व डिझेलचे भाव बदलत हाेते. मात्र दाेन महिन्यांपासून अचानक भाव स्थिर आहेत. आता भाव कसे स्थिर आहेत, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीचा तर परिणाम नाही ना?
फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गाेवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये विजय केंद्र शासनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या राज्यातील निवडणुका लक्षात घेऊनच केंद्र शासनाने भाव स्थिर ठेवले असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डिझेलचे भाव स्थिर असूनही महागाई चढतीवरच
१ डिझेलचे भाव वाढल्यास इतर वस्तूंचे भाव वाढतात, असे सांगितले जाते. ते काही प्रमाणात सत्यसुद्धा आहे. मात्र पेट्राेल व डिझेलचे भाव मागील दाेन महिन्यांपासून स्थिर आहेत. तरीही महागाई वाढतच चालली आहे.
२ एकदा वाढविलेल्या किमती दुकानदार सहजासहजी कमी करत नाही. कारण तेवढी किंमत माेजण्याची ग्राहकाची मानसिकता तयार झाली राहते. त्यामुळे खर्च कमी झाला तरी व्यापारी, उद्याेजक वस्तूंच्या किमती कमी हाेत नाही.