चार बालराेगतज्ज्ञ कशी राेखणार तिसरी लाट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:25+5:302021-05-29T04:27:25+5:30
गडचिराेली जिल्ह्यात ४८ प्राथमिक आराेग्य केंद्रे, ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १ महिला व बाल रुग्णालय व १ ...
गडचिराेली जिल्ह्यात ४८ प्राथमिक आराेग्य केंद्रे, ९ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये, १ महिला व बाल रुग्णालय व १ जिल्हा रुग्णालय आहे. त्यापैकी प्राथमिक आराेग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये बालराेगतज्ज्ञांचे पदच मंजूर नाही. तीन उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक पद मंजूर आहे. त्यापैकी कुरखेडा येथील पद रिक्त आहे, तर आरमाेरी व अहेरी येथील पद भरण्यात आले आहे. महिला व बाल रुग्णालयात वर्ग-१ चे एक पद मंजूर आहे. हे पद रिक्त आहे. वर्ग-२ ची २ पदे मंजूर आहेत. ही दाेन्ही पदे भरण्यात आली आहेत.
काेराेनाची दुसरी लाट बालकांनाच सर्वाधिक त्रासदायक ठरणार असल्याचा अंदाज साथराेगतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. अशा स्थितीत उपचारासाठी बालराेगतज्ज्ञांची पुरेशी फाैज असणे आवश्यक आहे. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये केवळ चार बालराेगतज्ज्ञ कार्यरत आहेत. तिसरी लाट आल्यास आराेग्य प्रशासनाची तारांबळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
ग्रामीण भागातील जनता आराेग्यबाबत फारशी जागरूक नाही. अशा स्थितीत काेराेनाची तिसरी लाट आल्यास या भागातील मुलांची अवस्था वाईट हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक आराेग्य केंद्र हे ग्रामीण भागातील आराेग्य सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र, याठिकाणी पदेच मंजूर नाहीत.
खासगी दवाखानेही नाहीत
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांची संख्या फार कमी आहे. गडचिराेली, देसाईगंज यासारख्या माेठ्या शहरांमध्येच एक किंवा दाेन खासगी बालराेगतज्ज्ञ आहेत. इतर तालुकास्तरावर तर हे तज्ज्ञच नाहीत. त्यामुळे बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्याशिवाय अन्य पर्याय राहत नाही.
प्राथमिक आराेग्य केंद्रे - ४८
बालराेगतज्ज्ञ - ०
ग्रामीण रुग्णालये - ९
बालराेगतज्ज्ञ - ०
उपजिल्हा रुग्णालये - ३
बालराेगतज्ज्ञ - २
महिला व बाल रुग्णालय - १
बालराेगतज्ज्ञ - २
स्तंभलेख
एकूण काेराेनाबाधित - २९,१४०
बरे झालेले रुग्ण - २७,३०१
उपचार घेत असलेले रुग्ण - १,१२९
१० वर्षांपेक्षा कमी वयाचे रुग्ण- ८७६
११ ते १८ वयाेगटातील रुग्ण - १,१४२