पत्रच नाही तर मानव विकास मिशनची बस कशी जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:00 AM2022-07-08T05:00:00+5:302022-07-08T05:00:16+5:30
मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शाळा सुरू हाेऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत मुख्याध्यापकांनी मानव विकास मिशनची बस व पासेससाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे आगारामार्फत अंदाजानुसार बसेस साेडल्या जात आहेत. काही मार्गांवर विद्यार्थी आहेत मात्र बस नाहीत तर काही मार्गांवर बस जात आहेत मात्र विद्यार्थी नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गडचिराेली आगाराला मानव विकास मिशनतर्फे ४९ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व बसेस विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी वापरायच्या आहेत. मानव विकास मिशनमार्फत आठवी ते बारावी व अहिल्याबाई हाेळकर याेजनेंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी माेफत पासेस उपलब्ध करून दिले जातात. ज्या ठिकाणचे पासेस आहेत. त्या मार्गावर महामंडळामार्फत बसेस चालविल्या जातात. पहिल्या दिवशीपासूनच सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील यासाठी मुख्याध्यापकांनी अगाेदरच कार्यवाही करणे आवश्यक आहे; मात्र सात दिवसांचा कालावधी उलटला तरी बसेस संदर्भात अजूनही पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे अनेक मार्गांवर बसेस नाहीत.
ज्या मार्गावर कमी प्रवासी मिळतात अशा मार्गावरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
डिझेलचा तुटवडा त्यात धावतात रिकाम्या बसेस
आगारात डिझेलचा नेहमीच तुटवडा राहताे. महत्त्वाच्या मार्गावरील बसेस रद्द केल्या जातात; मात्र विद्यार्थिनींची गैरसाेय हाेऊ नये, यासाठी बसेस साेडल्या जातात. काही मार्गांवर विद्यार्थिनीच नसल्याने बसेस रिकाम्या धावत आहेत. यात महामंडळाला ताेटा सहन करावा लागत आहे.
मुख्याध्यापकांनी पत्र द्यावे
- ज्या मार्गावर बसेसची गरज आहे. त्या मार्गावरील विद्यार्थिनींच्या पासेस काढण्यासाठी मुख्याध्यापकांनी पत्र देणे आवश्यक आहे; मात्र अजूनपर्यंत एकाही मुख्याध्यापकाने पासेसबाबत पत्र दिले नाही. दहा महिने कालावधीचे पास एकाचवेळी दिले जाणार आहेत.
स्मार्ट कार्ड काढणे सुरू
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक करण्यात आले आहे. गडचिराेली आगारात स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष आहे.
निम्म्या बसेसवर कारभार
गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. त्यापैकी २० बसेस पंढरपूरच्या जत्रेसाठी गेल्या आहेत. १५ बसेस नादुरुस्त अवस्थेत सुट्ट्या भागांसाठी आगारातच उभ्या आहेत. तर ६ बसेस चंद्रपुरातील वर्कशाॅपमध्ये उभ्या आहेत. एकूण ४१ बसेस कमी आहेत. केवळ ६२ बसेसवर आगाराचा कारभार सुरू आहे.