सात वर्षापूर्वी खोदकामात मिळाली होती गणेशाची विशाल मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:15+5:302021-09-14T04:43:15+5:30
वैरागड : आरमोरी तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या वैरागड एक प्राचीन गाव आहे. प्राचीन शिलालेखात ...
वैरागड : आरमोरी तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या वैरागड एक प्राचीन गाव आहे. प्राचीन शिलालेखात वैरागडचा उल्लेख वजागर असा आढळतो. हिऱ्याच्या खाणीला वज्रागर म्हणतात. त्याचा अपभ्रंश होऊन वैरागड असे नाव पडले. आजही येथे किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई मंदिर, आणि प्राचीन मंदिर व शिल्प पाहायला मिळतात. सात वर्षांपूर्वी या ठिकाणी खोदकामात गणेशाची विशाल मूर्ती मिळाली. ही मूर्ती चतुर्भुज स्थानक असून किंचित काट पटलेल्या काळ्या मजबूत दगडावर कोरलेली आहे.
येथील माराइबोडी जवळ सुरेश कोंडेकर यांचा तणसीचा वाडा आहे. त्यांच्या वाड्यात बरेच दिवसापासून गणेशाची मूर्ती कोरली असलेला टोकाचा भाग दिसायचा. ही गणेशाची मूर्ती आहे हे निश्चित होते. आठ-दहा वर्षापूर्वी एक दिवस गाटे मोहल्ल्यातील गणेश मंडळातील युवकाने उत्सुकतेपोटी ही मूर्ती खोदण्यास सुरुवात केली तर एका विशाल शिळेवर कोरलेली गणेशाची मूर्ती आढळून आली. ही मूर्ती सध्या घाटे मोहल्ल्यातील गणेश मंदिराच्या दर्शनी भागात ठेवलेली आहे.
ही मूर्ती चतुर्भुज असून काळ्या मजबूत दगडावर कोरलेली आहे. या मूर्तीची उंची ५ फूट रुंदी ३ फूट उंच आहे. संपूर्ण कोरलेल्या दगडाची उंची ६ फुटाची आहे. हा उजव्या सोंडेचा गणपती असून मूर्तीच्या डोक्याला मुकुट असून सर्वसाधारण जसे चतुर्भुज मूर्ती लागते तसेच असून खोदकाम मूर्तीचा बराच भाग तुटलेला असल्याने गणेशाच्या हातात असणारे बाकी साहित्य दिसत नाही. पाहणाऱ्याला संबंध मूर्ती लक्षात येत नाही. पण विशाल दगडाने मूर्ती पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेते तशी ही मूर्ती प्राचीन असून अशा प्रकारच्या प्रतिमा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या प्रमाणात उपलब्ध असल्याने मूर्तिशास्त्र या मूर्तीला महत्त्वाचे स्थान आहे.
130921\img_20210911_132818.jpg
फोटो.. वैरागड येथे होत कामात मिळालेली मूर्ती