शेकडो गावांत पावसामुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:42 AM2018-08-18T00:42:32+5:302018-08-18T00:42:58+5:30

अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री सुद्धा दमदार पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळली असून भामरागड शहर व अहेरी तालुक्यातील तिमरम, गुड्डीगुडम, निमलगुडम या गावांमध्ये पाणी शिरले आहे.

Hundreds of rain fall in hundreds of villages | शेकडो गावांत पावसामुळे हाहाकार

शेकडो गावांत पावसामुळे हाहाकार

Next
ठळक मुद्देसंपर्क तुटलेला : अनेक घरांना पाण्याचा वेढा; पडझडीमुळे नागरिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी, सिरोंचा, भामरागड या तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री सुद्धा दमदार पाऊस झाला. यामुळे ग्रामीण भागातील अनेक घरे कोसळली असून भामरागड शहर व अहेरी तालुक्यातील तिमरम, गुड्डीगुडम, निमलगुडम या गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक मार्गांवर पाणी असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागड - पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे गुरूवारी भामरागड शहर पाण्याखाली सापडले होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता शहरातील पाणी कमी झाले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पर्लकोटा पुलावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. मागील आठ दिवसांपासून सातत्याने भामरागड शहरात पाणी शिरत असल्याने दुकानदार व नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.
अंकिसा - आसरअल्ली येथे अतिवृष्टीमुळे राजुबाई पोचालू पानेम यांचे राहते घर कोसळून नुकसान झाले. घरातील दैनंदिन वापराचे साहित्य जळून खाक झाले. गावातील नागरिक साईनाथ पडिगालवार, संजय जैनवार, अजय आकुला, गजानन कलाक्षपवार, बबलू सुगरवार, राजेंद्र येन्ना, भास्कर गुडीमेटला, श्रीनिवास गोतुरी, पालारेड्डी, व्यंकट रामारेड्डी, पालेपापय्या यांनी तिला आर्थिक मदत दिली.
गुड्डीगुडम - अहेरी तालुक्यातील तिमरम, गुड्डीगुडम, निमलगुडम या गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे. तिमरम येथील रमेश इष्टाम यांचे घर पाण्यात बुडाले आहे. अचानक पूर आल्याने घरातील साहित्य काढणे शक्य झाले नाही. तसेच कोंबड्या, बकऱ्या व इतर साहित्य पुरात वाहून गेले. होर्रा सडमेक यांच्या घरात दोन फूट पाणी शिरले आहे. शेतीसाठी खरेदी करून ठेवलेले रासायनिक खत पाण्यात विरघळले. विलास सडमेक, दिलीप सडमेक, संदीप सडमेक, कैलास कोडापे, किष्टय्या सिडाम, खुशाबराव सिडाम, नामदेव मडावी, शंकर पेंदाम यांच्याही घरात पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले.
निमलगुडम - येथील सीताराम आत्राम, गंगा तलांडी, दुर्गा मडावी, सुनील सडमेक, सीताराम पेंदाम, आनंदराव कोडापे, मंगा पोरतेट, सखाराम सडमेक, दिवाकर सडमेक यांच्या घरात पाणी शिरले.
गुड्डीगुडम येथील सुखरूबाई आलाम यांचा गोठा कोसळला. यामुळे एक बैल जागीच ठार झाला. तर तीन बैल जखमी झाले आहेत. गुड्डीगुडम साजाच्या तलाठी नागमोती यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी सरपंच महेश मडावी, संतोष गणपुरवार, रमेश मडावी, तंमुस अध्यक्ष संदीप सिडाम, माजी पं.स.सदस्य गंगाराम आत्राम, इलिया शेख, श्रीकांत पेंदाम, नागेश शिरलावार, आनंदराव कोडापे, रमेश बावणकर, साईनाथ मडावी, राकेश सोयाम, नरेंद्र सडमेक, शंकर पेंदाम यांनी केली आहे. झिमेला येथील अर्जुन रामा सिडाम यांचे घर कोसळले. तहसीलदार प्रशांत घोरूडे यांनी सायंकाळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
पेरमिली - पेरमिली येथील आसिफ खान पठाण, श्रीनिवास संतोषवार, किरण कोंकावार, ललीता खोब्रागडे, यांच्या घरांचे नुकसान झाले. पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम यांनी नुकसानीची पाहणी केली.
कमलापूर - परिसरातील सुद्धागुडम येथील दुर्गावाही व्यंकटेश चिट्ट्याला यांचे मातीचे घर कोसळले. यामुळे जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. तलाठी दखणे यांनी पंचनामा केला. आविसंचे बबलू शेख, लक्ष्मीस्वामी अटेला, दुगय्या बेडकी, रोशन कुमरी यांनी पाहणी केली. शुक्रवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरूच होता.

Web Title: Hundreds of rain fall in hundreds of villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.