शेकडो चिमुकल्यांची दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:49 PM2019-07-18T22:49:08+5:302019-07-18T22:49:29+5:30

भामरागड पोलीस स्टेशनच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौड स्पर्धेत शेकडो चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला.

Hundreds of sparrows race | शेकडो चिमुकल्यांची दौड

शेकडो चिमुकल्यांची दौड

Next
ठळक मुद्देभामरागड पोलिसांचा पुढाकार : विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड पोलीस स्टेशनच्या वतीने भामरागड येथे मंगळवारी दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दौड स्पर्धेत शेकडो चिमुकल्यांनी सहभाग नोंदविला.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसीत व्हावे, यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ‘आदिवासी विकास दौड-२०१९’ चे आयोजन करण्यात आले. या दौड स्पर्धेत लोकबिरादरी आश्रमशाळा हेमलकसा, समुह निवासी शाळा, जय पेरसापेन आश्रमशाळा, भगवंतराव आश्रमशाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोलीस विभागातर्फे प्रथम विजेत्यास ७०० रुपये, द्वितीय विजेत्यास ५०० रुपये व तृतीय विजेत्यास ३०० रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ग्लुकोज, बिस्कुट, व पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी संबंधित शाळांचे शिक्षक, सीआरपीएफ, एसआरपीएफचे अधिकारी, क्युआरटी पथकाचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन शिक्षण घेतानाच खेळाकडेही लक्ष द्यावे. खेळामध्येही करीअर करता येते, असे आवाहन कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी केले.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
खेळामध्ये विद्यार्थ्यांची रूची वाढावी, या उद्देशाने दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या अगोदरही भामरागड पोलिसांनी विद्यार्थी व स्थानिक युवकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी, एकाग्रता वाढते. मेहनत करण्याची मानसिकता तयार होण्यास मदत होते.

Web Title: Hundreds of sparrows race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.