देशाच्या एकतेसाठी धावले शेकडो युवक
By admin | Published: November 1, 2015 01:45 AM2015-11-01T01:45:34+5:302015-11-01T01:45:34+5:30
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने गडचिरोली ...
गडचिरोलीत दौड स्पर्धा : कुलगुरूंनी दाखविली हिरवी झेंडी
गडचिरोली : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने गडचिरोली शहरात इंदिरा गांधी चौक ते आयटीआय चौकादरम्यान एकता दौड स्पर्धेचे आयोजन शनिवारी सकाळी ८ वाजता करण्यात आले होते. या दौड स्पर्धेत शहरातील शेकडो युवकांनी सहभाग दर्शविला.
दौड स्पर्धेला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैंठणकर, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी बी. बी. राऊत, सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन संकल्प दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.
आयटीआय चौकात दौड स्पर्धेचा समारोप करण्यात आला. यावेळी सहायक निबंधक म्हस्के, जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता महेंद्र बिसेन, कृषी अधिकारी एस. टी. मेहत्रे, समाजकल्याण विभागाचे रवींद्र खेडकर, मनोज कंगाली, ए. एस. जावळे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी क्रीडा कार्यालयाचे प्रशिक्षक बडकेलवार, क्रीडाधिकारी टापरे यांनी सहकार्य केले.