दौड स्पर्धेत धावले शेकडो युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:39 AM2018-07-16T00:39:55+5:302018-07-16T00:41:35+5:30

गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी आदिवासी विकास दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दौड स्पर्धेत शेकडो युवक, युवतींनी सहभाग नोंदविला.

Hundreds of youths ran in the race | दौड स्पर्धेत धावले शेकडो युवक

दौड स्पर्धेत धावले शेकडो युवक

Next
ठळक मुद्देगडचिरोली पोलीस स्टेशनचा उपक्रम : कलागुणांना वाव देण्याचा उद्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी आदिवासी विकास दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दौड स्पर्धेत शेकडो युवक, युवतींनी सहभाग नोंदविला.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दुर्गम भागातील आदिवासी युवक व युवतींना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सदर स्पर्धा आयोजित केली होती. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हा सत्र न्यायालयापर्यंत दौड स्पर्धा घेण्यात आली. यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाणार आहे. रविवारच्या स्पर्धेतून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ओमसाई मधुकर कुमरे, रवी लालसु पुंगाटी, संतोष रामचंद्र उसेंडी, निलेश बाजू तलांडी, यशकुमार मिलनसिंग जुडा या युवकांची तर रजनी कोमटी ओक्सा, विशाखा रमेश उसेंडी, अनिता जोगा मडावी, गायत्री मनोहर कुमरे या युवतींची निवड करण्यात आली.

Web Title: Hundreds of youths ran in the race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.