शेतीकामात यंत्राच्या वापराने शेतमजुरांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:22+5:302021-06-16T04:48:22+5:30
पूर्वी शेतांच्या पाळे धुऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी मजुरांना मातीकाम मिळत होते. हे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे ...
पूर्वी शेतांच्या पाळे धुऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी मजुरांना मातीकाम मिळत होते. हे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने केले जात आहे. त्यामुळे मातीकाम करून चार पैसे पदरी मिळवणारे मजूर रिकाम्या हाताने घरीच राहत असतात. तसेच शेतातील इतर कामे करण्यासाठी बहुतेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे शेतमजूर घर बांधकाम व इतर किरकोळ कामे करून पोट भरू लागले आहेत. शेतातील कापणी व बांधणी, रोवणी कामे वगळता शेतातील कोणतेही काम ट्रॅक्टरशिवाय केले जात नाही. दिवसेंदिवस शेतीकामात ट्रॅक्टरचा वापर अधिक वाढत गेला. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावातच हंगामी स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या ट्रॅक्टर भाडे प्रति तास ७०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतले जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना आता सुगीचे दिवस आले असून, शेतातील नांगरणीची व इतरही कामे ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे गावागावांत ट्रॅक्टर अधिक दिसून येत आहेत. शेतीकामे करणे सोयीचे झाले असले तरी या कामावर अवलंबून असणारे शेतमजूर कामाअभावी शेतमजुरांची उपासमार होत आहे.
===Photopath===
130621\5114img-20210613-wa0128.jpg
===Caption===
शेतीचे कामे यंत्राच्या साहाय्याने होत असल्याने मजुरांची उपासमार फोटो