पाेटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:51+5:302021-09-02T05:18:51+5:30
बहुजन समाज पक्षाच्या वतीने श्री सत्यसाईबाबा ग्रामीण सेवा केंद्र मोदुमडगू येथे एकदिवसीय शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ...
बहुजन समाज पक्षाच्या वतीने श्री सत्यसाईबाबा ग्रामीण सेवा केंद्र मोदुमडगू येथे एकदिवसीय शिबिराचे आयाेजन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रबोध रामटेके बाेलत हाेते. शिबिराचे उद्घाटन बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून बामसेफ कार्यकर्ते पी. आर. सडमेक, प्रा. रामराव नन्नावरे, जिल्हा प्रभारी गणपत तावाडे, बीव्हीएफ संयाेजक कैलास कोंडागुर्ला, अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष खुशाल डोंगरे उपस्थित होते. आदिवासींकरिता खऱ्या अर्थाने कायद्याची अमलबंजावणी झाली नाही. अंमलबजावणी झाली असती तर आदिवासींचा सर्वांगीण विकास झाला असता, असे सांगत आदिवासींनी संघटित व्हावे, असे आवाहन पी. आर सडमेक यांनी केले. प्रास्ताविक खुशाल डोंगरे, संचालन कैलास कोंडागुर्ला तर आभार प्रीतम झाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नारायण अलोणे, सौजन्या कोवे, हेमंत कुलसंगे, महादेव करमरकर, राजेश्वर वाघाडे, नामदेव डोंगरे, मुकुंद दुर्गे व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
310821\3107img-20210830-wa0159.jpg
बहुजन समाजाला बसपाच एकमेव पर्याय -प्रबोध रामटेके