मध्यरात्री ठोठावले मृत्यूने दार! दरवाजा उघडताच धारदार शस्त्राने केले सपासप वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:54 AM2021-11-24T10:54:19+5:302021-11-24T11:15:16+5:30

मध्यरात्रीच्या सुमारास घराची डोअरबेल वाजवून उठवत अज्ञात व्यक्तीने पती-पत्नीवर धारदार शस्राने हल्ला केला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे.

husband killed and wife seriously injured in an attack with a sharp weapon by unknown | मध्यरात्री ठोठावले मृत्यूने दार! दरवाजा उघडताच धारदार शस्त्राने केले सपासप वार

मध्यरात्री ठोठावले मृत्यूने दार! दरवाजा उघडताच धारदार शस्त्राने केले सपासप वार

Next
ठळक मुद्देआरमोरीत अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात पती ठार, पत्नी गंभीर जखमीकारण अद्याप अस्पष्ट

गडचिरोली : मध्यरात्रीच्या सुमारास घराची डोअरबेल वाजवून उठवत अज्ञाताने पती-पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आरमोरी शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे.

शहरातील टेलरिंग व्यावसायिक म्हणून ओळख असलेले गौतम ऋषी निमगडे (६३ वर्ष) व त्यांची पत्नी माया निमगडे (६० वर्ष) या दाम्पत्याच्या घरात घुसून अज्ञात व्यक्तीने रात्री २ ते ३ वाजताच्या सुमारास धारदार शस्राने हल्ला केला. यात गौतम निमगडे यांचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी आहे. या हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे कोणते कारण असावे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

पोलीस सूत्रानुसार, निमगडे दाम्पत्य सोमवारच्या रात्री तहसील कार्यालयासमोर असलेल्या वस्तीतील त्यांच्या घराच्या वरच्या माळ्यावर नेहमीप्रमाणे झोपलेले होते. रात्री २ ते ३ च्या दरम्यान अज्ञाताने दरवाज्याची घंटी वाजविली. एवढ्या रात्री कोण आले म्हणून बघण्यासाठी गौतम निमगडे उठले आणि त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी दारात उभ्या असणाऱ्या अनोळखी व्यक्तीने क्षणाचाही विलंब न लावता हातात असलेल्या शस्त्राने त्यांच्या डोक्यावर सपासप वार केले. दरम्यान, माया निमगडे समोर आल्या असता त्यांच्यावरही त्या व्यक्तीने वार करून पळ काढला.

जखमी अवस्थेत माया यांनी तळमजल्यावर राहात असलेल्या मुलाला मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. मुलाने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर जखमी दाम्पत्याला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे भरती केले. पण उपचारादरम्यान गौतम निमगडे यांचा मृत्यू झाला.

गंभीर जखमी असलेल्या माया यांना ब्रम्हपुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. आरमोरी पोलिसांनी मृताचा मुलगा नितीन यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

श्वान पथक, ठसे तज्ज्ञांकडून पाहणी

पोलीस विभागाने आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले. याशिवाय ठसे तज्ज्ञांनीही पाहणी करून ठसे घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनीही भेट दिली. या हत्याकांडाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत.

शांत स्वभाव असताना कोण शत्रु?

मृत निमगडे हे शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. आरमोरीत अनेक वर्षांपासून ‘टॉप इन टाऊन’ या नावाने त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय चालत होता. अशा व्यक्तीचा कोण शत्रू असू शकतो, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पोलिसांनी कसून चौकशी करून संबंधित आरोपीला हुडकून काढून त्याला अटक करावी, अशी मागणी आरमोरी शहरवासीयांकडून केली जात आहे.

Web Title: husband killed and wife seriously injured in an attack with a sharp weapon by unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.