पाेळ्या का केल्या नाही म्हणत पतीने पत्नीच्या डाेक्यावर घातले पाेळपाट
By दिगांबर जवादे | Published: July 4, 2023 08:35 PM2023-07-04T20:35:26+5:302023-07-04T20:35:34+5:30
पती संपत वासुदेव हलामी याच्याविराेधात कोरची पोलिस स्टेशन येथे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
दिगांबर जवादे/ गडचिराेली: पाेळ्या बनविल्या नाहीत म्हणून संतप्त झालेल्या पतीने पत्नीच्या डाेक्यावर पाेळपाट मारला. यात ती गंभीर जखमी झाली. ही घटना काेरची तालुक्यातील नांदळी गावात घडली. विशेष म्हणजे दाेन दिवसांपूर्वी काेरची तालुक्यातीलच काेचिनारा गावातील एका पतीने घरगुती वादातून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले.
अनिता हलामी (३५) रा. नांदळी असे जखमी पत्नीचे नाव आहे. तर संपत वासुदेव हलामी (४५) असे आराेपी पतीचे नाव आहे. अनिता पतीसोबत माहेरी सोहले येथे गेली हाेती. ते दाेघेही ३ जुलै राेजी दुपारी दीड वाजता आपल्या गावी नांदळी येथे पाेहाेचले. संपत भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. भाजीपाला खरेदी केल्यानंतर ताे दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास परत आला. तब्येत बरी नसल्याने अनिता आराम करत होती. जेवणात पोळ्या का केल्या नाही, असे संपतने अनिताला विचारले. तेव्हा तब्येत बरी वाटत नाही, थोडा आराम करून पाेळ्या बनवते, अशी अनिता म्हणाली. पुढे वाद वाढत गेला. भांडणादरम्यान संपतने अनिताच्या डाेक्यावर पाेळपाट आदळला. यात अनिता गंभीर जखमी झाली.
तिच्या डाव्या कानाच्यावर मार लागून रक्त निघू लागले. गावातील नागरिकांनी तिला काेरची रुग्णालयात भरती केले. पती संपत वासुदेव हलामी याच्याविराेधात कोरची पोलिस स्टेशन येथे कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. कोरची पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार मधुकर बरसागडे तपास करत आहेत.