हैदराबाद बस गुड्डीगुडमजवळ नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:18+5:302021-07-02T04:25:18+5:30
गडचिरोलीवरून हैदराबादला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता ही बस गडचिराेलीवरून निघाली. ही बस रात्री ९.३० पर्यंत हैदराबादला पाेहाेचणार हाेती. या ...
गडचिरोलीवरून हैदराबादला जाण्यासाठी सकाळी ८ वाजता ही बस गडचिराेलीवरून निघाली. ही बस रात्री ९.३० पर्यंत हैदराबादला पाेहाेचणार हाेती. या बसमध्ये ६४ प्रवासी हाेते. त्यापैकी आठ ते दहा प्रवासी थेट हैदराबादला जाणार हाेते.
गडचिरोलीवरून गुड्डीगुडम येथे येतपर्यंत ही बस दाेनवेळा नादुरुस्त झाली. लांब पल्ल्यावर जाणाऱ्या बसेस सुसज्ज व याेग्य असणे आवश्यक आहेत; परंतु भंगार बसेस लांब अंतरावर पाठविल्या जात असल्याने त्यांच्यात वारंवार बिघाड येताे; परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागताे. या बसमध्ये पहिल्यांना अहेरी येथे व दुसऱ्यांदा गुड्डीगुडम येथे बिघाड आला. बसमध्ये बिघाड आल्यानंतर प्रवाशांना गुड्डीगुडम येथे दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत ताटकळत राहावे लागले. या प्रकाराबाबत चालक व वाहक यांना विचारले असता, इंजिनमध्ये बिघाड आल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या साेयीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आहेत; परंतु त्यांच्यात वारंवार बिघाड येत असल्याने प्रवाशांना त्रास हाेताे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर नवीन बसेस पाठवाव्या, अशी मागणी प्रवाशांनी केली.