पर्यावरणासाठी हायड्राेजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किमतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2022 05:00 AM2022-04-03T05:00:00+5:302022-04-03T05:00:10+5:30

सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर वाढत आहे. गडचिराेली शहरातही अनेक इलेक्ट्रिक दुचाकी फिरताना दिसतात. मात्र शहरात इलेक्ट्रिकवर चालणारी एकही कार नाही. इलेक्ट्रिकवरील कार १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहे. एवढी किंमत मध्यमवर्गीय नागरिक खर्च करू शकत नाही. हायड्राेेजन कारची किंमत ५० लाखांच्या पुढे आहे. 

Hydrogen for the environment, electric car rhythm heavy, but worth it? | पर्यावरणासाठी हायड्राेजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किमतीचे काय?

पर्यावरणासाठी हायड्राेजन, इलेक्ट्रिक कार लय भारी, पण किमतीचे काय?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री हे चार दिवसांपूर्वी हायड्राेजनवर चालणाऱ्या कारमधून संसदेत पाेहाेचले. त्यामुळे हायड्राेजन व इलेक्ट्रवर चालणाऱ्या कारचा मुद्दा चर्चेत आला. या कार आपण खरेदी करू शकणार काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात हाेता. या कार पर्यावरणपूरक असल्या तरी त्यांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते. 
पेट्राेल व डिझेलच्या कारमुळे प्रदूषणाची समस्या गंभीर हाेत चालली आहे. त्यामुळे या इंधनाला पर्याय म्हणून इतर इंधनांच्या वापराबाबतचे संशाेधन सुरू आहे. मात्र सामान्य नागरिकांना परवडेल, अशा कारची निर्मिती अजूनपर्यंत झाली नाही.

इलेक्ट्रिक कार १६ लाखांच्या पुढे
सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या दुचाकीचा वापर वाढत आहे. गडचिराेली शहरातही अनेक इलेक्ट्रिक दुचाकी फिरताना दिसतात. मात्र शहरात इलेक्ट्रिकवर चालणारी एकही कार नाही. इलेक्ट्रिकवरील कार १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची आहे. एवढी किंमत मध्यमवर्गीय नागरिक खर्च करू शकत नाही. 

हायड्राेजन कार ५० लाखांच्या पुढे
हायड्राेजनवर चालणारी कार पर्यावरणासाठी अतिशय पूरक असल्याचा दावा केला जात असला तरी किमतीच्या बाबतीत ही कार परवडणारी नाही. हायड्राेेजन कारची किंमत ५० लाखांच्या पुढे आहे. 

सरकारने सबसीडी द्यावी
-    पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रिक, सीएनजी, हायड्राेजन कार व दुचाकींचा वापर वाढण्यासाठी या दुचाकींवर शासनाने सबसीडी देण्याची गरज आहे. सबसीडी मिळाल्यास वाहनांच्या किमती कमी हाेतील. मध्यवर्गीय नागरिक ही वाहने वापरू लागतील. 

सीएनजीची गरज

गडचिराेली शहरात सीएनजी पम्प सुरू केल्यास सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढू शकते. सीएनजीवर चालणारी वाहने पेट्राेल, डिझेलच्या तुलनेत कमी प्रमाणात प्रदूषण तयार करतात. 

पेट्राेल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदूषण हाेते. ही बाब मान्य आहे. मात्र या दाेन इंधनाशिवाय इतर पर्याय नागरिकांसमाेर उपलब्ध नाही. त्यामुळे या दाेनच इंधनावर चालणारी वाहने खरेदी करतात. या दाेन इंधनाला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन वापरायचे असेल तर ते स्वस्त हाेणे आवश्यक आहे.
- आकाश बाेबाटे, तरुण

 

Web Title: Hydrogen for the environment, electric car rhythm heavy, but worth it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.