पुन्हा मिळणार माेफत सिलिंडर पण महागडा गॅस कसा भरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 05:00 AM2021-08-13T05:00:00+5:302021-08-13T05:00:34+5:30

यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गॅस भरणे बंद केले आहे. रिकामे सिलिंडर घरी पडून आहे, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. 

I will get the cylinder again but how to fill the expensive gas? | पुन्हा मिळणार माेफत सिलिंडर पण महागडा गॅस कसा भरणार ?

पुन्हा मिळणार माेफत सिलिंडर पण महागडा गॅस कसा भरणार ?

Next

दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पंतप्रधानांनी उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला. यात काही अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, खरी अडचण गॅस भरण्याची आहे. गॅसच्या किमती वाढल्याने अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस भरणे परवडेल काय? असा प्रश्न उपस्थित आहे. 
यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी गॅस भरणे बंद केले आहे. रिकामे सिलिंडर घरी पडून आहे, तर पुन्हा चुलीवरच स्वयंपाक सुरू केला असल्याचे दिसून येत आहे. 

सिलिंडर भरणे कसे परवडणार 

ज्यावेळी गॅस खरेदी केला. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. आता मात्र त्या प्रचंड वाढल्या आहेत. केवळ स्वयंपाक करण्यासाठी महिन्याचे एक हजार रुपये खर्च करणे शक्य नाही. परिणामी आता चुलीवरच स्वयंपाक केला जात आहे. 
-उषा बन्साेड, गृहिणी

उज्ज्वला याेजनेतून खरेदी केलेला सिलिंडर घरातच पडून आहे. पूर्वीही आम्ही चुलीवरच स्वयंपाक करीत हाेताे. आताही चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. जुनेच दिवस आलेत. चुलीवरचा स्वयंपाक गॅसच्या तुलनेत रुचकर लागतो. तसेच गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेण्यासारख्या घटनांपासून दूर राहता येते.
- काशीबाई पेंदाम, गृहिणी

Web Title: I will get the cylinder again but how to fill the expensive gas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.