दारू विक्रीला साथ देणाऱ्या पक्षाला दाखविणार इंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:28 AM2019-02-28T01:28:45+5:302019-02-28T01:29:28+5:30

येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.

I will show the party to the sale of liquor | दारू विक्रीला साथ देणाऱ्या पक्षाला दाखविणार इंगा

दारू विक्रीला साथ देणाऱ्या पक्षाला दाखविणार इंगा

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत पक्षांची अडचण : मुरूमगाव येथील २०० महिलांचा एकमताने ठराव

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दारूचा पुरवठा करण्यासाठी विक्रेत्यांना साथ देणाºया पक्षांना आम्ही मतदार करणार नाही, असा ठराव तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या २०० महिलांनी एकमताने मंजूर केला.
मतदारांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रत्येकच पक्ष आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. वाट्टेल त्या क्लृप्त्या लढविल्या जातात. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मतदारांना दारू वाटून त्यांची मते मिळविण्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. धानोरा तालुक्यातही हा प्रकार नेहमीच चालतो. तालुक्याच्या सीमावर्ती भागात याचे प्रमाण जास्त असते. मुरूमगाव येथील महिला हा प्रकार नेहमीच अनुभवतात. परंतु आता महिलांनी दारूविक्र ी बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखिवण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन केलेला ठराव राजकीय पक्षांसाठी अडचणीचा ठरणार आहे.
मुरुमगाव येथे दारुबंदीसाठी येत असलेल्या अडचणींचा आढावा तसेच भविष्यातील वाटचालीसंदर्भात चर्चाही यावेळी करण्यात आली. गावातील प्रत्येक मोहल्ल्यामध्ये नियमित गस्त घालण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आले.

Web Title: I will show the party to the sale of liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.