आयएएस अधिकारी मृगनाथन यांची नवरगाव ग्रामपंचायतीला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:49+5:302021-05-28T04:26:49+5:30

समृद्ध गाव संकल्प योजनेतून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजना अंतर्गत कामे सुरू आहेत. शेतीमध्ये मजगीची कामे, बाेडी ...

IAS officer Mriganathan visits Navargaon Gram Panchayat | आयएएस अधिकारी मृगनाथन यांची नवरगाव ग्रामपंचायतीला भेट

आयएएस अधिकारी मृगनाथन यांची नवरगाव ग्रामपंचायतीला भेट

Next

समृद्ध गाव संकल्प योजनेतून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजना अंतर्गत कामे सुरू आहेत. शेतीमध्ये मजगीची कामे, बाेडी बांधकाम, शेततळे, गुरांचे गोठे, शोषखड्डे इत्यादी कामे सुरू आहेत. या कामांची गुणवत्ता राखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कामाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते त्याच अभ्यास करण्यासाठी मृगनाथन यांनी भेट दिली. ग्रामपंचायत नवरगाव अंतर्गत येणाऱ्या एरंडी गावातील मारोती गावडे, वासुदेव कुमोटी यांचे मजगी काम, विश्वेशवर मडावी यांचे बाेडी काम, किसन जागी यांचा गुरांचा गोठा, श्रमदानातून निर्माण होणारे कुरमाघर, राजीव गांधी भवन, विहीर व साैर ऊर्जा पंप असणाऱ्या नळयोजनेची पाहणी केली. मजुरांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. समृद्ध गाव संकल्पनेतून गावात नियोजन करण्यात आलेल्या कामाची माहिती सरपंचांनी मृगनाथन यांना दिली. मृगनाथ यांनी समाधान व्यक्त केले. सर्व नागरिकांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचावाकरिता मास्कचा वापर व सर्व नागरिकांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले. यावेळी तहसीलदार सी. जी. पित्तुलवार, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, दामोदर भगत नायब तहसीलदार, भास्कर राऊत सहायक कार्यक्रम अधिकारी, ऋषी निकोडे, विजय भेडके, वर्षा मार्गे, खुशाल निवारे, बाजीराव नरोटे आदी हजर हाेते.

Web Title: IAS officer Mriganathan visits Navargaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.