आय.ए.एस.अधिकाऱ्यांची कोंढाळा व कुरुड शाळेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:52+5:302021-07-07T04:45:52+5:30

कुरुड : प्रशिक्षण कालावधी सुरू असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आय.ए.एस.अधिकारी मृगनाथम एम. यांनी शाळांची शैक्षणिक स्थिती, कामकाज, ...

IAS officers visit Kondhala and Kurud schools | आय.ए.एस.अधिकाऱ्यांची कोंढाळा व कुरुड शाळेला भेट

आय.ए.एस.अधिकाऱ्यांची कोंढाळा व कुरुड शाळेला भेट

Next

कुरुड : प्रशिक्षण कालावधी सुरू असलेले सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आय.ए.एस.अधिकारी मृगनाथम एम. यांनी शाळांची शैक्षणिक स्थिती, कामकाज, व्यवस्थापन व अडचणी जाणून घेण्यासाठी सोमवारी जि. प. उच्च प्राथ. शाळा कोंढाळा व जि. प. हायस्कूल कुरुड येथे भेट दिली.

भेट देताना सोबत प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, उपशिक्षणाधिकारी नाकाडे, शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा , समग्र शिक्षाचे अभियंता भरडकर उपस्थित होते. कोंढाळा येथील भेटीत केंद्रप्रमुख विजय बन्सोड यांनी शिक्षण विभाग पंचायत समिती देसाईगंजची संख्यात्मक माहिती दिली. नंतर मुख्याध्यापक व शिक्षकांशी हितगुज करुन मृगनाथम एम. यांनी माहिती जाणून घेतली.

त्यानंतर जि.प. हायस्कूल कुरुड येथे भेट देऊन शैक्षणिक बाबींतर्गत विज्ञान, इंग्रजी व मराठी विषयावर चर्चा घडवून आणली. दरम्यान शाळा व्यवस्थापन व प्रशासनावर शिक्षणाधिकारी परसा व उपशिक्षणाधिकारी नाकाडे यांनी मार्गदर्शन केले. पालकांच्या सहमतीने शाळा सुरु करणे तसेच इयत्ता ११ वी विज्ञान व कला वर्ग सुरु करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक शैक्षणिक साहित्य लवकरच पुरविण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी अजमेरा यांनी सांगितले. तर बांधकाम दुरुस्तीची पाहणी अभियंता भरडकर यांनी केली.

भेटी दरम्यान कोंढाळा शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका निरुपारा देशपांडे तर जि.प. हायस्कूलच्या वतीने मुख्याध्यापिका जयश्री पराते यांनी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कोंढाळाचे सहशिक्षक संतोष टेंभुर्णे, योगेश ढोरे, सुरेश आदे, भीमा ठवरे, रजनी जांभुळकर, माधुरी रामगुंडे तसेच जि.प. हायस्कूलचे सहशिक्षक सुरजुसे, बी.टी. सेलोकर, नोमेश मेश्राम, फहमिदा खान, चेतना अलामे, डी.डी.ब्रम्हनायक, रवी नारनवरे, शहारे, आकरे उपस्थित होते. भेटीतील चर्चेबद्दल अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

060721\img-20210706-wa0029.jpg

कों ढाळा शाळे त भेट

Web Title: IAS officers visit Kondhala and Kurud schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.