इकाॅर्निया वनस्पतीमुळे तलावातील मासेमारीस अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 10:10 AM2021-04-27T10:10:01+5:302021-04-27T10:12:48+5:30

Gadchiroli news चामोर्शी शहरासह तालुक्यातील बऱ्याच तलावांना जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे. याचा परिणाम पाणी साठवणुकीसह मासेमारी व्यवसायावर होत आहे. दरवर्षी मासेमारी संस्थांचे उत्पन्न घटत आहे.

Icarnia plant poses a problem to pond fishing in Gadchiroli Distirct | इकाॅर्निया वनस्पतीमुळे तलावातील मासेमारीस अडचण

इकाॅर्निया वनस्पतीमुळे तलावातील मासेमारीस अडचण

googlenewsNext
ठळक मुद्देजल साठवणूक घटलीअल्प उत्पन्नामुळे व्यवसायावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याभरात नदी, नाले, तलाव, बोड्याची संख्या बरीच आहे. यात मासेमारी करून व्यवसायावर पाेट भरणाऱ्या केवट, भोई, धीवर समाज बांधवांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. तलाव व बाेड्या समाजबांधवांसाठी आधार ठरत आहेत. परंतु चामोर्शी शहरासह तालुक्यातील बऱ्याच तलावांना जलपर्णी वनस्पतीने विळखा घातला आहे. याचा परिणाम पाणी साठवणुकीसह मासेमारी व्यवसायावर होत आहे. दरवर्षी मासेमारी संस्थांचे उत्पन्न घटत आहे.

चामोर्शी शहरातील गाव तलावाचा दरवर्षी लिलाव केला जातो. लिलावानंतर तलावाची मालकी प्राप्त झालेल्या मत्स्य सहकारी संस्था तसेच नागरिक पावसाळ्यात मत्स्यबीज टाकतात. साधारणत: दिवाळी व संक्रातीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. यंदाही चामोर्शीच्या गाव तलावात मासोळ्याचे प्रमाण चांगले आहे व वाढही बरीच झाली आहे. मात्र या तलावाला जलपर्णी (इकाॅर्निया) वनस्पतीने विळखा घातल्याने मासेमार बांधवांना मासे पकडण्यासाठी तलावात योग्य प्रकारे जाळे टाकता येत नाही. त्यामुळे शहरातील मासेमार बांधव त्रस्त झाले आहेत. सध्या या तलावात संपूर्ण क्षेत्रात जलपर्णी वनस्पती वाढली असल्याने संपूर्ण तलाव हिरवेगार दिसून येत आहे. संबंधित विभागाने या तलावातील गाळाचा पूर्णत: उपसा करून जलपर्णी वनस्पतीची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अशा प्रकारची मागणीही शहरातील केवट, धीवर व भोई समाज बांधवांकडून सातत्याने होत आहे.

बहुउपयाेगी तलाव

चामाेर्शी येथील गाव तलावाचा उपयोग महिलांना कपडे धुण्यासाठी होताे. तसेच याच तलावात गणपती, शारदा, दुर्गादेवीच्या मूर्तीचे तसेच गौरीचे विसर्जन केले जाते. हा तलाव बहुउपयाेगी आहे. त्यामुळे या गाव तलावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रशासनाने चामोर्शी लगतच्या या गाव तलावातील गाळ उपसा करून जलपर्णी वनस्पतीची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.

Web Title: Icarnia plant poses a problem to pond fishing in Gadchiroli Distirct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी